काश्मीर आमचे, पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचे: ऋषी कपूर

वृत्तसंस्था
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

या प्रकरणी आता ऋषी कपूर यांनी ट्विट करत या वादात उडी घेतली. ते म्हणाले, "फारुख अब्दुल्लाजी सलाम, आज मी तुमच्याशी सहमत आहे, सर, जम्मू-काश्मीर आपला आहे आणि पाकव्याप्त काश्मीर त्यांचा. हाच या प्रश्नावर तोडगा आहे. त्यामुळे हे आपण स्वीकारायला हवे.

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी पाकव्याप्त काश्मिर प्रश्नाच्या वादात उडी घेत जम्मू-काश्मीर आमचा आहे आणि पाकव्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचा अविभाज्य घटक आहे", असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि जम्मू-काश्मीरचे माजी मु्ख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी शनिवारी पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग असल्याचे म्हटले होते. अब्दुल्ला म्हणाले होते, की पाकव्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचा भाग आहे. त्याला अधिक स्वायत्तता हवी. हे कोणीही बदलू शकत नाही. तसेच जे स्वातंत्र्याचा शोध घेत आहेत. ते दिशाभूल करत असल्याचे विधान त्यांनी केले होते.

या प्रकरणी आता ऋषी कपूर यांनी ट्विट करत या वादात उडी घेतली. ते म्हणाले, "फारुख अब्दुल्लाजी सलाम, आज मी तुमच्याशी सहमत आहे, सर, जम्मू-काश्मीर आपला आहे आणि पाकव्याप्त काश्मीर त्यांचा. हाच या प्रश्नावर तोडगा आहे. त्यामुळे हे आपण स्वीकारायला हवे.

दरम्यान, फारुख अब्दुल्ला यांच्या वक्तव्यावरुन आधीच वाद निर्माण होण्याची शक्यता असताना आता ऋषी कपूर यांनी या वादात उडी घेतल्याने याविषयाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.