काश्‍मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या चार दहशतवाद्यांना कंठस्नान

वृत्तसंस्था
शनिवार, 27 मे 2017

जम्मू काश्‍मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील रामपूर सेक्‍टर येथे नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चार दहशतवाद्यांना भारताच्या सुरक्षा कंठस्नान घातले आहे. आणखी काही दहशतवादी दबा धरून बसले असून सुरक्षा पथकासोबत त्यांची चकमक सुरूच आहे.

श्रीनगर - जम्मू काश्‍मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील रामपूर सेक्‍टर येथे नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चार दहशतवाद्यांना भारताच्या सुरक्षा कंठस्नान घातले आहे. आणखी काही दहशतवादी दबा धरून बसले असून सुरक्षा पथकासोबत त्यांची चकमक सुरूच आहे.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शनिवारी रात्री साडेसातच्या आसपास दक्षिण रामपूरपासून दहा किलोमीटर अंतरावर लष्कराने केलेल्या कारवाईत चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. या ठिकाणी आणखी काही दहशतवादी लपले असण्याची शक्यता असून लष्कराकडून दहशतवाद्यांची शोधमोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यान जम्मू-काश्‍मीरमधीलच सैमुत्राल सेक्‍टरमध्येही काही दहशतवादी दबा धरून बसल्याचे वृत्त असून लष्कराने त्यांना चारही बाजूंनी घेरले आहे. तेथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून कारवाई सुरूच आहे. लष्कराचे जवान लपलेल्या जागांपासून दहशतवाद्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.