भाजप अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रश्‍नच नाही : शहा

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

लखनौ: राज्यसभेत निवडून गेल्यास अमित शहा भाजपचे अध्यक्षपद सोडणार असल्याच्या चर्चेला विराम देत आज खुद्द अमित शहा यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याचा प्रश्‍नच उदभवत नाही, असे स्पष्ट केले. पक्षाध्यक्षाची जबाबदारी ही समाधानाने आणि प्रामाणिकपणे पार पाडत असल्याने राजीनामा देण्याचा प्रश्‍नच नसल्याचे ते म्हणाले.

येथील पत्रकार परिषदेत शहा म्हणाले, की माझ्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. मी आनंदाने काम करत आहे. आपण (प्रसार माध्यमे) या कामांना धक्का लावू नका. शहा यांनी मोदी सरकारच्या कारकिर्दीचे कौतुक केले. नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाचे सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान असल्याचे सांगत शहा यांनी मोदी यांनी देशाची प्रतिष्ठा वाढविल्याचे नमूद केले. मोदींच्या नेतृत्वाखाली घराणेशाही, जातीयवाद आणि राजकारणाचे केंद्रीकरण संपवण्यास यश आल्याचे शहा म्हणाले. 2019 मध्ये भाजप आणखी मोठ्या बहुमताने निवडून येईल, असाही दावा त्यांनी केला. मोदी सरकारचे स्वच्छ प्रशासन हाच या दाव्याचा आधार असल्याचे शहा म्हणाले, की मोदी सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे, ते पाहता जनता आम्हाला अधिक बहुमत देऊन काम करण्याची संधी देईल. तत्कालीन डॉ. मनमोहनसिंग सरकारच्या धोरणाला "पॅरालिसिस' झाल्याचे म्हटले जात होते. प्रत्येक मंत्री स्वत:ला पंतप्रधान समजत होता आणि "बिचाऱ्या' पंतप्रधानास कोणीही पंतप्रधान मानत नव्हते.

Web Title: lucknow news bjp president and amit shah