नीट परिक्षेत पंजाबचा नवदीप पहिला; महाराष्ट्रातून अभिषेक पहिला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

नीट परिक्षेचा निकाल खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
cbseresults.nic.in

नवी दिल्ली - वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी केंद्र स्तरावर घेण्यात येणाऱ्या नीट परिक्षेचा आज (शुक्रवार) निकाल जाहीर झाला आहे.

पंजाबचा नवदीप सिंग देशात पहिला आला आहे. तर मध्यप्रदेशचा अर्चीत गुप्ता देशात दुसरा आणि मध्यप्रदेशचाच मनिष देशात तिसरा आला आहे. कर्नाटकमधील संकिर्थ सदानंदने चौथे स्थान मिळविले आहे. महाराष्ट्रातील अभिषेक डोग्राने राज्यात पहिले तर देशात पाचवे स्थान मिळविले आहे.

नीट परिक्षेचा निकाल खालील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
cbseresults.nic.in