लोकांनी काय खावे हे सरकार ठरवत नाही: केंद्रीय मंत्री

वृत्तसंस्था
बुधवार, 31 मे 2017

लोकांनी काय खावे आणि काय खाऊ नये हे सरकार ठरवत नाही. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केरळमध्ये या फेस्टिव्हलचे आयोजन करून त्यांची संस्कृती दाखवून दिली आहे. 

नवी दिल्ली - गोमांस आणि गोहत्येवरून वाद सुरूच असून, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकांनी काय खावे आणि काय खाऊ नये हे सरकार ठरवत नसल्याचे म्हटले आहे.

केंद्र सरकारने गोहत्येवर बंदी आणत गोमांस विक्रीवरही बंदी आणले आहे. केरळमध्ये सरकारच्या या निर्णयाला विरोध करत बीफ फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. या विषयी मेघवाल यांना विचारले असता त्यांनी हे उत्तर दिले.

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मेघवाल म्हणाले, की लोकांनी काय खावे आणि काय खाऊ नये हे सरकार ठरवत नाही. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केरळमध्ये या फेस्टिव्हलचे आयोजन करून त्यांची संस्कृती दाखवून दिली आहे. 

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
बीफ फेस्टिव्हलवरून विद्यार्थ्याला मारहाण​
मुख्यमंत्र्यांचा शेट्टी, जयंतरावांवर नेम; सदाभाऊंची ढाल​
दिल्ली आयआयटीतील विद्यार्थीनीची आत्महत्या

जनावरे विक्री बंदीबाबत दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सूट शक्‍य
शेतकरी संपावर काहीही साध्य होणार नाही : माधव भंडारी
दीड पायाच्या ‘लक्ष्मी’ची झेप
#स्पर्धापरीक्षा - बलुचिस्तान
शहरांच्या जागतिक क्रमवारीत पुणे तेरावे