शेतकरी, दलित यांची भाजपला काळजी नाही: राहुल गांधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 जुलै 2017

नवी दिल्ली: "जीएसटी'साठी भारतीय जनता पक्षाने मध्यरात्री संसदेचे दरवाजे उघडले. मात्र ते शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर मिनीटभरसुद्धा बोलत नाहीत. सत्ताधारी भाजप सरकार अतिशय कठोर आहे, त्यांना शेतकरी, गरीब आणि दलितांची काळजी नाही, अशी टीका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे आज केली.

ते म्हणाले की, लोकसभेत आज आम्ही शेतकऱ्यांचा प्रश्‍न उपस्थित करण्याचा प्रयत्न करीत होतो. मात्र आम्हाला बोलू दिले नाही. वास्तविक पाहता पंतप्रधान लोकसभेत उपस्थित होते. राजस्थानच्या बन्सवारामधील शेतकऱ्यांशी ते बोलत होते.

भारतीय जनता पक्ष केवळ उद्योगपतींची काळजी करते गरिबांची नाही, असे राहुल गांधी म्हणाले. जीएसटीसाठी भाजपने कशी घाई केली हे त्याचे उदाहरण आहे. आम्ही त्यांना जीएसटी लागू करण्यासाठी तीन ते चार महिने थांबा, असे सांगत होतो, मात्र त्यांनी एक जुलैला मध्यरात्री तो लागू केला. छोट्या व्यावसायिकांना यात तोटा होईल, हे आम्ही सांगत होतो, मात्र त्यांनी त्याची काळजी घेतली नाही. प्राप्तिकर भरणाऱ्या लोकांसाठी ते सरकार चालवीत आहेत, असे गांधी म्हणाले. मोठ्या व्यावसायिकांना जीएसटीची भीती नाही ते बऱ्याच जणांना रोजगार देऊ शकतात. मात्र त्यांना छोटे व्यावसायिक, कामगार, दलित यांची त्यांना काळजी नाही, असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी "मेक इन इंडिया'ची गोष्ट करतात मात्र त्यांचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष असल्याचे गांधी म्हणाले.