मोदींच्या धोरणांमुळेच काश्‍मीर होरपळतेय: राहुल गांधी

वृत्तसंस्था
शनिवार, 22 जुलै 2017

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जम्मू- काश्‍मीरमधील अशांततेवरून शुक्रवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. मोदी सरकारच्या धोरणांमुळेच आज जम्मू काश्‍मीर होरपळतेय, अशी टीका त्यांनी केली आहे. काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.

संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी विविध मुद्यांवर आपली मते व्यक्त केली. डोकलामचा वाद सुरू असतानाच काश्‍मीरप्रश्नी भारताने पाकबरोबर चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचा समाचार घेताना ते म्हणाले, चीन आणि पाकिस्तानबरोबर काश्‍मीरप्रश्नी चर्चा व्हावी, असे बोलले जात आहे; पण तो भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. काश्‍मीरचा प्रश्न आम्ही सोडवू, कुणा तिसऱ्या पक्षाने त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही. काश्‍मीर इज इंडिया, इंडिया इज काश्‍मीर अशा शब्दांत त्यांनी ठणकावले.

गेल्या काही महिन्यांपासून काश्‍मीर धुमसतोय. याला मोदी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) धोरणे जबाबदार असल्याचे मी दीर्घकाळापासून म्हणत आहे. त्यांनी काश्‍मीरला आगीच्या खाईत ओढले आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.