राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही तत्त्वाची लढाई : सोनिया गांधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 जून 2017

नवी दिल्ली: राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही विचारधारा आणि तत्त्वाची लढाई असून, विरोधी पक्ष ती लढणार आहे, असे प्रतिपादन कॉंग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी येथे केले.

आमच्यासाठी ही लढाई विचारधारा, तत्त्व आणि खरेपणाची असून आम्ही ती लढणार आहोत. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवार म्हणून मीरा कुमार यांनी अर्ज दाखल केल्यानंतर श्रीमती गांधी बोलत होत्या. अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील 17 विरोधी पक्षांच्या सदस्यांसह मीराकुमार यांनी आपला अर्ज दाखल केला.

मीरा कुमार यांच्या अर्जाच्या एका सेटमध्ये सोनिया गांधी या अनुमोदक आहेत. सध्या सुटीनिमित्त परदेशात असलेले कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही मीरा कुमार यांच्या उमेदवारीचा स्वागत केले असून देश आणि जनतेला ज्या मूल्यांनी बांधले आहे त्याचे कुमार प्रतिनिधित्व करतात, असे ते म्हणाले. मीरा कुमारजी आम्हाला गर्व आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.