...जातीयवादाविरोधात लढण्याची हीच वेळ- सोनिया गांधी

पीटीआय
सोमवार, 17 जुलै 2017

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नेत्यांशी संवाद

स्वातंत्र्य लढ्यातील मूल्यांशी बांधिलकी हवी

नवी दिल्ली : भेदभाव, सामाजिक फाटाफूट आणि सांप्रदायिकता देशावर लादण्यास प्रयत्नशील असणाऱ्या विचारांसोबत सामना करण्याची हीच वेळ आहे आणि त्यासाठी स्वातंत्र्यलढ्यातील मूल्यांशी बांधिलकी राखून ती जतन करण्यासाठी आपल्याला एकत्रितपणे त्यांचा मुकाबला करावा लागेल, असे आवाहन कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज येथे विरोधी पक्षांच्या संयुक्त बैठकीत केले.

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतिपदासाठी होणाऱ्या निवडणुकीतील विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार अनुक्रमे मीरा कुमार आणि गोपालकृष्ण गांधी यांचा औपचारिक परिचय व त्यांना मतदान करण्याच्या संदर्भात आज ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

विरोधी पक्षांकडे संख्याबळ कमी आहे, ही बाब खरी असली तरी, या संकुचित प्रवृत्तींविरोधातील ही लढाई आहे आणि ती लढण्याचे कर्तव्य सर्वांना पार पाडावे लागेल, असे सांगून त्या म्हणाल्या, राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्ही घटनात्मक व सर्वोच्च पदे आहेत. राज्यघटनेचे पावित्र्य, संरक्षण आणि जतन करणे ही या पदांची प्रमुख जबाबदारी असते. दुर्दैवाने आज कायदा आणि राज्यघटना दोन्ही संकटात आहेत आणि म्हणूनच एकत्रितपणे त्यासाठी लढण्याचे वेळ आली आहे. ही निवडणूक म्हणजे दोन विचारसरणींमधील संघर्ष आहे, मूल्यांसाठीचा लढा आहे आणि त्यामुळेच विवेकानुसार मतदानाची गरज आहे.

उमेदवारांचा परिचय
भाषणाच्या प्रारंभी सोनिया गांधी यांनी उपस्थित सदस्यांना मीरा कुमार व गोपालकृष्ण गांधी यांचा परिचय करून दिला. भारतातील विविधता, सहिष्णुता, सर्वसमावेशकता आणि धर्मनिरपेक्षतेशी बांधिलकी असलेल्या या दोन व्यक्ती आहेत आणि आपापल्या क्षेत्रात त्यांनी मोठे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.

मीरा कुमार यांनी भारतीय परराष्ट्रसेवेत दिलेले योगदान, त्यानंतर राजकारण प्रवेश आणि विविध मंत्रिपदाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर समर्थपणे हाताळलेले लोकसभेचे अध्यक्षपद याचाही त्यांनी उल्लेख केला, तर गोपालकृष्ण गांधी यांनी यापूर्वी दोन राष्ट्रपतींबरोबर केलेले काम, भारतीय प्रशासकीय सेवेचा अनुभव. भारताचे राजदूत म्हणून बजावलेली महत्त्वाची कामगिरी आणि राज्यपालपद याची माहितीही त्यांनी दिली.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:
शंभर टक्‍के शेतीवर उपजीविका असणाऱ्यांनाच कर्जमाफी - मुख्यमंत्री
ट्रोल्सची बिल्ली, राजनाथसिंहांवर म्यॉंव...!​
द्रविड, झहीरची मानहानी करू नका! - गुहा​
भावाने मारलेल्या दगडामुळे बहिणीला गमवावे लागले प्राण​
फेडररचे विक्रमी विजेतेपद​
भिवंडी जवळ अपघातात जुने नाशिकमधील 4 मृत्युमुखी; 2 जखमी​
काँग्रेसचा वाह्यातपणा कधीपर्यत सुरू राहणार?: भांडारकर​
‘आयटी’चा गिअर टाकल्याने पीएमपी होणार ‘गतिमान’​

देश

चंडीगड: डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम याला शिक्षा सुनावल्यानंतर हरियानात हिंसाचार घडवून आणल्याप्रकरणी हनीप्रीत इन्सानविरुद्ध...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

हैदराबाद: वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम (एमबीबीएस) प्रवेशास पात्र न ठरल्याने पतीने पत्नीला जाळल्याची घटना येथे नुकतीच घडली. याप्रकरणी...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

देवरिया (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील देवरिया शहरात पंधरा वर्षे वयाच्या विद्यार्थीनीचा शाळेच्या तिसऱया मजल्यावरून पडून मृत्यू...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017