कैफियत एक्स्प्रेसचे दहा डबे रुळावरून घसरले; 50 जण जखमी

वृत्तसंस्था
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

उत्तर रेल्वेचे व्यवस्थापक एम. सी. चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीहून आझमगडला जाणारी कैफियत एक्स्प्रेसने डंपरला धडक दिल्याने इंजिनसह 10 डबे रुळावरुन घसरले. या अपघातात 50 जण जखणी झाले असून, ही दुर्घटना पहाटे 2 वाजून 30 मिनिटांनी घडली.

लखनौ : उत्तर प्रदेशात अरैया येथे आज (बुधवार) पहाटे कैफियत एक्स्प्रेसचे दहा डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात 50 जण जखमी आहेत. उत्तर प्रदेशात आठवडाभरात दुसऱ्यांदा अपघात झाला आहे. 

उत्तर रेल्वेचे व्यवस्थापक एम. सी. चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीहून आझमगडला जाणारी कैफियत एक्स्प्रेसने डंपरला धडक दिल्याने इंजिनसह 10 डबे रुळावरुन घसरले. या अपघातात 50 जण जखणी झाले असून, ही दुर्घटना पहाटे 2 वाजून 30 मिनिटांनी घडली.

रेल्वे प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू असून रेल्वेचे सर्व अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात नुकताच उत्कल एक्स्प्रेसला अपघात झाला होता. यामध्ये 22 जणांचा मृत्यू झाला होता. तर, 156 जण जखमी झाले होते.

रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी कैफियत एक्स्प्रेसच्या अपघाताबाबत ट्विरवरुन माहिती देताना म्हटले आहे, की तेथील परिस्थितीवर मी स्वत: लक्ष ठेऊन आहे. बचावकार्य सुरु आहे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहचण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अपघातात काहीजण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.