गोरखपूर: रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा बंद केल्याने 30 मुलांचा मृत्यू

वृत्तसंस्था
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

गोरखपूर (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमध्ये बीआरडी मेडिकल कॉलेज रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा बंद केल्यानमुळे गेल्या 48 तासांत तब्बल 30 मुलांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना पुढे आली आहे.

गोरखपूर (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमध्ये बीआरडी मेडिकल कॉलेज रुग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा बंद केल्यानमुळे गेल्या 48 तासांत तब्बल 30 मुलांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना पुढे आली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 9 ऑगस्ट रोजी बीआरडी मेडिकल कॉलेजचा पाहणी दौरा केला होता. याबाबतचे ट्वीट देखील त्यांनी केले होते. 66 लाखांचं बील थकवण्यात आल्यामुळे ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा करणाऱ्या फर्मने हा ऑक्सिजनचा पुरवठा बंद केला होता. लिक्विड ऑक्सिजन देखील गुरुवारपासून बंद होते. एनएनयू वॉर्डमध्ये दाखल असलेल्या 10 तर इन्सेफेलाइट्स वॉर्डमधील 12 बालकांचा मृत्यू झाला. दरम्यान यानंतरही रुग्णालय ऑक्सिजनची तरतूद न करू शकल्याने मृतांचा आकडा 30 वर पोहोचला. रुग्णालयाचे निष्काळजीपणामुळे 30 मुलांचा बळी गेला आहे. परंतु, याबाबतची माहिती देण्यासाठी अद्याप कोणीही पुढे आलेले नाही.

मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनच्या पुरवठा करणाऱ्या कंपनीचे नाव पुष्पा अॅण्ड सन्स असल्याची माहिती पुढे आली आहे. ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाल्यामुळे मुलांचा मृत्यू झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले. रुग्णालयातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंग हे राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज भेट घेणार आहेत. यानंतर ते रुग्णालयाला भेट देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: uttar pradesh news 30 children die in 48 hours in Gorakhpur hospital