काश्मीरमध्ये निर्णय घेण्यासाठी लष्कराचे हात मोकळे: जेटली

वृत्तसंस्था
गुरुवार, 25 मे 2017

आम्ही लष्करी अधिकाऱ्यांना स्वतंत्र्यपणे निर्णय घेण्याची परवानगी दिली आहे. युद्धजन्य परिस्थितीत काय करायला हवे, यासाठी लष्कराला संसदेतील खासदारांना विचारावे लागणार नाही.

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमध्ये युद्धासारखे निर्णय घेण्याचे भारतीय लष्कराला स्वातंत्र्य असल्याचे केंद्रीय संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे.

काश्मीरमध्ये एका काश्मिरी युवकाला जीपला बांधल्याप्रकरणी जेटली यांनी हे वक्तव्य केले आहे. मेजर लेतुल गोगोई यांच्या नावाचा उल्लेख न करत जेटली यांनी म्हटले आहे, की लष्करी अधिकाऱ्यांच्या सहाय्यानेच लष्कराचे समाधान केले जाईल.

काश्मीरमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास कशी हाताळण्यात येईल? या प्रश्नावर उत्तर देताना जेटली म्हणाले, की आम्ही लष्करी अधिकाऱ्यांना स्वतंत्र्यपणे निर्णय घेण्याची परवानगी दिली आहे. युद्धजन्य परिस्थितीत काय करायला हवे, यासाठी लष्कराला संसदेतील खासदारांना विचारावे लागणार नाही.