अमेरिकेच्या हल्ल्यात 16 पोलिस कर्मचारी ठार

वृत्तसंस्था
शनिवार, 22 जुलै 2017

कंदहार: अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तान पोलिस दलातील दोन कमांडरसह 16 कर्मचारी ठार झाल्याची माहिती पोलिस दलाचे प्रवक्ते सलाम अफगाण यांनी दिली.

कंदहार: अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तान पोलिस दलातील दोन कमांडरसह 16 कर्मचारी ठार झाल्याची माहिती पोलिस दलाचे प्रवक्ते सलाम अफगाण यांनी दिली.

काल (ता.21) सायंकाळी झालेल्या या हल्ल्यात दोन कर्मचारी जखमी झाले. हेलमंड प्रांतात तालिबानी दहशतवाद्यांच्या ताब्यात असलेल्या एका गावाची झाडाझडती सुरू असताना हा हल्ला झाला. या हल्ल्यानंतर "नाटो'कडून एक पत्रक काढून याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याता आली आहे. मृतांच्या नातेवाइकांच्या दुःखात आम्ही सहभागी असून, याबाबत चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन या पत्रकाद्वारे देण्यात आले. दरम्यान, अमेरिकेच्या हल्ल्यात निष्पाप नागरिक व पोलिस कर्मचाऱ्यांचा बळी जाण्याची ही पहिलीच वेळ नसून, यापूर्वी फेब्रुवारीमध्ये संगीन येथील हवाई हल्ल्यात 18; तर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात कुंडूझमधील कारवाईत 32 नागरिकांचा मृत्यू झाला होता.