कट्टर मुस्लिम दहशतवाद संपवून टाकू; मोदी-ट्रम्प यांचे संयुक्त निवेदन

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 जून 2017

मेलेनिया ट्रम्प यांनी मोदींकडून भेट
व्हाईट हाऊस येथे पोहचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी मेलेनिया ट्रम्प यांना भेटवस्तू दिल्या. यामध्ये कांगडा घाटीमध्ये बनविण्यात आलेले चांदीचे ब्रेसलेट आणि काश्मीर आणि हिमाचलमध्ये हाताने विणलेली शाल यांचा समावेश होता. याबरोबरच मोदींनी 52 वर्षांची ऐतिहासिक परंपरा कायम राखताना 1965 मध्ये अब्राहम लिंकन यांच्या निधनानंतर प्रसिद्ध करण्यात आलेला टपाल तिकीट ट्रम्प यांना भेट दिले. 

वॉशिंग्टन - पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, त्यांनी सोमवारी रात्री अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यावेळी संयुक्तरित्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात कट्टर मुस्लिम दहशतवाद संपविण्यावर सहमती दर्शविण्यात आली. कोणत्याही देशाने दहशतवाद्यांना आपल्या भूमीचा वापर करू देऊ नये, या शब्दांत उभय नेत्यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.

व्हाईट हाऊस येथे मोदी आणि ट्रम्प यांची भेट झाली. यावेळी ट्रम्प यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प याही उपस्थित होत्या.

दहशतवाद, व्यापार यांसह अनेक महत्त्वाच्या विषयांवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. ट्रम्प यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच यांच्यात चर्चा होत आहे. गळाभेट घेतल्यानंतर संयुक्तरित्या निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. यामध्ये त्यांनी जगातून दहशतवाद संपुष्टात आणण्याचे वक्तव्य केले. पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांचे आभार मानत, हा माझा नाही तर भारतातील सव्वाशे कोटी नागरिकांचा सन्मान असल्याचे म्हटले आहे.

ट्रम्प म्हणाले -

 • कट्टर मुस्लिम दहशतवाद नष्ट करू
 • भारत आमचा चांगला मित्र असून, भारताची संस्कृती महान आहे
 • भारत ही वेगाने वाढणारी मजबूत अर्थव्यवस्था आहे.
 • भारत लवकरच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची बरोबरी करेल
 • भारत स्वातंत्र्याची 70 वर्षे पूर्ण करत आहे.
 • मोदी आणि मी दोघेही सोशल मिडीयावरील मोठे नेते आहोत
 • या चर्चेमुळे दोन्ही देशांतील संबंध आणखी दृढ होतील

मोदी म्हणाले -

 • दहशतवाद हे मोठे आव्हान असून, मानव जातीच्या रक्षणासाठी सर्वांनी मिळून दहशतवाद संपुष्टात आणला पाहिजे
 • भारत आणि अमेरिका 'ग्लोबल इंजिन ऑफ ग्रोथ' आहेत
 • या दौऱ्यामुळे दोन्ही देशांतील संबंध आणखी उंची गाठतील
 • न्यू इंडिया आणि मेक अमेरिका ग्रेट अगेन हा एकच संकल्पना आहेत
 • अमेरिकेचे मजबुतीकरण हे भारताच्या हिताचे आहे
 • अफगाणिस्तानमध्ये शांतता गरजेची असून, दहशतवादाविरोधात लढाई दोन्ही देशांच्या हिताची आहे
 • ट्रम्प यांच्या कुटुंबीयांना मी भारत भेटीचे निमंत्रण देत आहे

मेलेनिया ट्रम्प यांनी मोदींकडून भेट
व्हाईट हाऊस येथे पोहचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी मेलेनिया ट्रम्प यांना भेटवस्तू दिल्या. यामध्ये कांगडा घाटीमध्ये बनविण्यात आलेले चांदीचे ब्रेसलेट आणि काश्मीर आणि हिमाचलमध्ये हाताने विणलेली शाल यांचा समावेश होता. याबरोबरच मोदींनी 52 वर्षांची ऐतिहासिक परंपरा कायम राखताना अब्राहम लिंकन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 1965 मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले टपाल तिकीट ट्रम्प यांना भेट दिले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
पुणे: चार धरणांत मिळून 0.12 टीएमसीने वाढ​
माण: बोअरवेलमध्ये पडलेल्या मंगेशचा अखेर मृत्यू
सलाहुद्दीनला ठरविले जागतिक दहशतवादी​
सर्जिकल स्ट्राइकवर एकही प्रश्‍न नाही: नरेंद्र मोदी​
मुख्यमंत्र्यांना विठ्ठल पूजेपासून रोखणार​
शाहू कार्यात तंत्रज्ञानाधारित रोजगाराची बीजं - डॉ. रघुनाथ माशेलकर​
३१ दिवस, पावणे चारशे तास आणि ४६ हजार पोळ्या​