मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळ अपघात; तीन ठार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 मे 2017

रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डे आगवेजवळ आज (शुक्रवार) पहाटे बस उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण घटनास्थळीच मृत्युमुखी पडले असून एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डे आगवेजवळ आज (शुक्रवार) पहाटे बस उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण घटनास्थळीच मृत्युमुखी पडले असून एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

विशाल ट्रॅव्हल्सची (एमएच 46 जे 5252) बस मुंबईहून गोव्याच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी बसमध्ये 47 प्रवासी होते. दरम्यान आज पहाटे सव्वा चारच्या सुमारास बस रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे आगवे येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटली. हा एवढा भीषण अपघात होता की दोन प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अन्य काही जण जखमी झाले. दरम्यान जखमींपैकी एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींवर डेरवण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसमधील बहुतेक प्रवासी परेलहून मालवणला जाण्यासाठी प्रवास करत होते.