ऑस्ट्रेलियन ओपन: श्रीकांत उपांत्य फेरीत; सिंधु पराभूत

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 जून 2017

भारताच्या महिला बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधुला मात्र या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये पराभव स्वीकारावा लागला. तैवानची अग्रमानांकित खेळाडू ताई त्झु यिंग हिने चुरशीच्या झालेल्या या सामन्यात सिंधुस 21-10, 20-22, 16-21 असे पराभूत केले

नवी दिल्ली - सध्या स्वप्नवत "फॉर्म'मध्ये असलेल्या भारतीय बॅडमिंटनपटू किदंबी श्रीकांत याने आज (शुक्रवार) साई प्रणित या अन्य भारतीय खेळाडूचा 25-23, 21-17 असा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिज स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या विजयाबरोबरच श्रीकांत याने सलग तिसऱ्यांदा सुपर सीरिज स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.

भारताच्या महिला बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधुला मात्र या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये पराभव स्वीकारावा लागला. तैवानची अग्रमानांकित खेळाडू ताई त्झु यिंग हिने चुरशीच्या झालेल्या या सामन्यात सिंधुस 21-10, 20-22, 16-21 असे पराभूत केले. पहिला गेम गमाविल्यानंतर यिंगने सामन्यात जोरदार पुनरागमन केले.