कॉंग्रेस सरकारमधील शिक्षणमंत्री बरे होते : आदित्य ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

ठाकरे यांच्या हस्ते दादर येथे अत्याधुनिक स्वच्छतागृहाचे उद्‌घाटन झाले, त्या वेळी पत्रकारांशी बोलताना शिक्षणमंत्री तावडे यांचे नाव न घेता ठाकरे यांनी टोला लगावला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्यावर त्यांनी टीका केली. पूर्वी विद्यार्थ्यांचे ऐकले जात असे. कुलगुरू भेटत असत. आता यात राज्यपालांना हस्तक्षेप करावा लागतो.

मुंबई - मुंबई विद्यापीठात सध्या सुरू असलेला कारभार पाहता आधीच्या कॉंग्रेस सरकारमधील शिक्षणमंत्री आणि कुलगुरू बरे होते का, असा प्रश्‍न पडतो, असा टोला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना शनिवारी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी लगावला. मुंबई विद्यापीठाच्या मुदत ठेवी मोडल्याबद्दल चौकशी करण्याची मागणी ठाकरे यांनी केली. 

ठाकरे यांच्या हस्ते दादर येथे अत्याधुनिक स्वच्छतागृहाचे उद्‌घाटन झाले, त्या वेळी पत्रकारांशी बोलताना शिक्षणमंत्री तावडे यांचे नाव न घेता ठाकरे यांनी टोला लगावला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्यावर त्यांनी टीका केली. पूर्वी विद्यार्थ्यांचे ऐकले जात असे. कुलगुरू भेटत असत. आता यात राज्यपालांना हस्तक्षेप करावा लागतो.

ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया होत नसताना उत्तरपत्रिका तपासणी मात्र ऑनलाइन करण्याचा हट्ट कशाला, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला स्थगिती द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.