#स्पर्धापरीक्षा - राष्ट्रीय फलोत्पादन अभियान

टीम ई सकाळ
मंगळवार, 6 जून 2017

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील लेख www.esakal.com वर प्रसिद्ध करण्यात येत आहेत. 

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी 
http://sakalpublications.com वर पुस्तके उपलब्ध आहेत. 

राज्यात या वर्षी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने एकूण 350 कोटी रुपयांच्या कृती आराखड्यास दि. 30 जुलै 2016 रोजी मंजुरी दिली. अभियानांतर्गत केंद्राने आपल्या हिश्‍श्‍याच्या 60 टक्के रकमेच्या पहिल्या हप्त्यापोटी 32 कोटी 75 लाख 64 हजार रुपये राज्याला पोहोच केले आहेत. त्यात राज्य हिश्‍श्‍याचे पहिल्या हप्त्याचे 21 कोटी 83 लाख 76 हजार रुपये टाकून राज्याने एकूण 54 कोटी 59 लाख 40 हजार रुपयांची रक्कम उपलब्ध करून दिली आहे. गेल्या वर्षी फलोत्पादन उत्पादनासाठी केंद्राकडून 50 टक्के व राज्य शासनाकडून 50 टक्के निधी उपलब्ध करण्यात येत होता; परंतु यात बदल करून यंदा हा आर्थिक वाटा अनुक्रमे 60 आणि 40 टक्के करण्यात आला. गेल्या आर्थिक वर्षात राज्यासाठी 245 कोटी रुपयांचा कृती आराखडा मंजूर झाला होता. या वर्षी मात्र गतवर्षीच्या निधीपैकी 105 कोटी अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे. यात राष्ट्रीय कृषी योजनेतून गेल्या वर्षीच्या तुलनेत 110 कोटी रुपयांची अधिक तरतूद केली असून यंदा एकूण 185 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे 

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान 
फळबागांच्या क्षेत्र विस्ताराबरोबर फलोत्पादन पिकांकरता दर्जेदार उत्पादन, विक्री व प्रक्रिया व्यवस्था उभी करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाची सुरुवात करण्यात आली. उत्पादकापासून ते उपभोक्‍त्यापर्यंत फलोत्पादन पिकांच्या मालाची योग्य साखळी निर्माण करणे आणि त्यामध्ये उत्पादक शेतकरी, काढणीनंतरचे व्यवस्थापन करणारी यंत्रणा, प्रक्रिया उद्योजक, विक्री व्यवस्था यांच्या विकासासाठी या अभियानात विविध योजनांचा अंतर्भाव करण्यात आला. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून वैयक्तिक शेतकऱ्यांच्या विकास संकल्पनेपेक्षा सामुदायिक शेतकऱ्यांच्या गटाची स्थापना करून त्याच्यात बदल घडवून आणण्यावर भर देण्यात आला. अभियानामध्ये जमिनीचा पोत सुधारण्यापासून बियाणे, कलमे, रोपे, खते, औषधे या प्रारंभीच्या गरजांबरोबरच काढणी, वाहतूक, साठवणूक, प्रक्रिया व विक्री व्यवस्था या सर्वसमावेशक विकास कार्यक्रमाचा अंतर्भाव आहे. 

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील आणखी लेख वाचा -

#स्पर्धापरीक्षा - भारत आणि ब्रिक्स परिषद

#स्पर्धापरीक्षा - भारत आणि रशियादरम्यान संरक्षण, ऊर्जा क्षेत्रांत करार

#स्पर्धापरीक्षा - बलुचिस्तान

#स्पर्धापरीक्षा - प्रधानमंत्री पीक विमा योजना

#स्पर्धापरीक्षा - अलिप्ततावादी चळवळीविषयी

#स्पर्धापरीक्षा - रिओ ऑलिंपिक स्पर्धा 2016

#स्पर्धापरीक्षा - गुगल प्रोजेक्ट लून

#स्पर्धापरीक्षा -'स्टॅंड अप इंडिया' योजना

#स्पर्धापरीक्षा - बौद्धिक संपदा हक्क धोरण

#स्पर्धापरीक्षा - 'कृषी विज्ञान केंद्र ज्ञान तंत्र' पोर्टल