कौतुक ऐकायला ‘ती’ मात्र नाही...

राजकुमार थोरात
मंगळवार, 4 जुलै 2017

वालचंदनगर - पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला... तिने परीक्षेत २२४ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत क्रमांकही पटकावला... मात्र या यशाचा आनंद साजरा करायला आज ‘ती’ या जगात नाही... एप्रिल महिन्यात नाशिक जिल्ह्यात अपघाती मृत्यू झालेल्या वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील अनुष्का गोरखनाथ निकम या चिमुकलीची ही करुण कहाणी...

येथील भारत चिल्ड्रन्स ॲकॅडमी शाळेत इयत्ता पाचवीत अनुष्का निकम शिक्षण घेत होती. हुशार व मनमिळाऊ स्वभावामुळे आई, वडील व शाळेतील सर्व शिक्षकांची ती लाडकी होती. तिचे वडील गोरखनाथ येथील वर्धमान विद्यालयात शिक्षक, तर आई जयश्री पाठशाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. परीक्षा संपल्यानंतर अनुष्का देवळा (नाशिक) येथे आजोळी सुटीसाठी गेली होती; मात्र २३ एप्रिल रोजी टायर फुटल्याने कार रस्त्यालगतच्या झाडाला धडकून झालेल्या अपघात अनुष्का, तिचे आजोबा व त्यांचे व्याही या तिघांचा जागीच मृत्यू झाला. नुकताच शिष्यवृत्तीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. अनुष्का गुणवत्ता यादीत दुसरी आली. शिष्यवृत्ती परीक्षेत अनुष्काचे यश मिळवणे आणि अनुष्काचे जगात नसणे या वास्तवाने गहिवरून गेलेले तिचे आई, वडील व प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर यांच्याकडे कौतुकासाठी शब्द होते; पण हे कौतुक ऐकायला अनुष्का मात्र नाही.