रामकुमार शेडगे आता दिग्दर्शनात 

rajkumar
rajkumar

गेल्या एका दशकाहून जास्त काळ जनसंपर्काच्या माध्यमातून कार्यरत असणारे रामकुमार शेडगे यांनी आता दिग्दर्शनासह अभिनयाकडे आपली पावले वळविली आहेत. अनेक रियालिटी शोमध्ये ते स्पर्धक म्हणून सहभागी झाले अन यशही मिळत गेले. हा संघर्ष सुरू असतानाच "लेट्‌स गो बॅक' या मराठी चित्रपटात त्यांना महत्त्वाची भूमिका मिळाली. त्यानंतर जवळपास दोन वर्ष चांगल्या भूमिकेच्या शोधात असतानाच अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांशी त्यांच्या भेटीगाठी झाल्या. पण, मनासारखी भूमिका मिळाली नाही. त्यावेळी त्यांनी मिळेल ते काम केले. मात्र, त्यांना एक गोष्ट जाणवली की अभिनय करायचा असेल तर तुम्हाला घरातून भक्कम पाठिंबा हवा आहे. नाहीतर चित्रपटसृष्टीत तुमचा कोणीतरी गॉडफादर पाहिजे. यापैकी त्यांच्याकडे कोणतीही गोष्ट नव्हती. 

अभिनयाबरोबरच पत्रकारिता करत रामकुमार हे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत झाले आणि आतापर्यंत 100 हून अधिक चित्रपटांचे प्रसिद्धी प्रमुख म्हणूनही काम पाहिले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचेही ते प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम पाहत आहे. 

हे करत असताना रामकुमार यांनी दीडशेंहून जास्त माहितीपट, लघुपटांचे दिग्दर्शन व निर्मिती केली. हे करत असतानाच लेखक आबा गायकवाड यांच्याकडून एक संवेदनशील अशी गोष्ट त्यांनी ऐकली अन चित्रपटाचे दिग्दर्शन करायचे ठरविले. त्यानंतर मिहीर कुलकर्णी यांच्याशी बोलणे झाले "अ.ब.क'चा विषय निघाला अन खऱ्याअर्थाने येथूनच त्यांच्या दिग्दर्शनाचा प्रवास सुरू झाला. "अ.ब.क' हा चित्रपट शिक्षणावर भाष्य करणारा आहे. यात हिंदी, मराठी, तेलगू, भोजपुरी आणि मराठीतील तगडी स्टार मंडळी काम करत आहे. तमन्ना भाटिया, सुनील शेट्टी, रवी किशन, साजिद खान, सतीश पुळेकर, विजय पाटकर, किशोर कदम, बालकलाकार ऑस्करमध्ये गाजलेली "लायन' फेम सनी पवार, साहिल जोशी, मिथाली पटवर्धन, आर्या घारे अशा अनेक कलाकारांनी या चित्रपटात काम केले आहे. विशेष म्हणजे चित्रपटातील एका गीताला अमृता देवेंद्र फडणवीस यांचा स्वर लाभला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com