आॅक्टोबरमध्ये रंगणार कल्पना एक आविष्कार अनेक

टीम ई सकाळ
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

एकांकिका स्पर्धांच्या वर्तुळात मानाच्या समजल्या जाणाऱ्या 'अस्तित्व' आयोजित अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद सहआयोजित कै. श्री. मु.ब.यंदे पुरस्कार कल्पना एक आविष्कार अनेक २०१७ या अभिनव एकांकिका स्पर्धेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.यंदा ही स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात रंगणार आहे.

मुंबई : एकांकिका स्पर्धांच्या वर्तुळात मानाच्या समजल्या जाणाऱ्या 'अस्तित्व' आयोजित अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद सहआयोजित कै. श्री. मु.ब.यंदे पुरस्कार कल्पना एक आविष्कार अनेक २०१७ या अभिनव एकांकिका स्पर्धेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.यंदा ही स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात रंगणार आहे.

रंगभूमीच्या अभिवृद्धीसाठी या स्पर्धेचे संयुक्तपणे आयोजन करण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदने
मागच्या वर्षी घेतला आहे. त्यानुसार या स्पर्धेची प्राथमिक आणि अंतिम फेरी परिषदेच्या माहीम इथल्या यशवंतराव
नाट्यसंकुलात होणार आहे. यंदा या स्पर्धेचे संयुक्त वर्ष ३१ वे असून खुल्या गटासाठी होणाऱ्या या स्पर्धेचा विषय
स्पर्धेच्या प्रथेप्रमाणे मागच्या वर्षीच जाहीर करण्यात आला होता.

यंदाच्या स्पर्धेचे विषय सूचक आहेत ज्येष्ठ साहित्यिक - नाटककार महेश एलकुंचवार आणि त्यांनी दिलेला विषय आहे
‘कृपा’ . विशेष म्हणजे या विषयाची प्रस्तावना न देता,या शब्दाच्या पर्यायाने विषयच्या वेगवेगळ्या अर्थातून अनेक
नाट्यशक्यता जन्म घेतील.त्यामुळे यंदाचा विषय अनेक बहुआयामी एकांकिका सादर करण्याची संधी स्पर्धकांना देत आहे.
या विषयाच्या विविध पैलूंना स्पर्श करणारी एकांकिका या स्पर्धेत स्पर्धकांना सादर करायची आहे. एकांकिका स्पर्धांच्या
आयोजकांमध्ये झालेल्या समन्वयानुसार कोणत्याही मोठ्या स्पर्धांच्या तारखा एकत्र येणार नाहीत, याची दक्षता घेण्यात
आली आहे, त्याप्रमाणे स्पर्धेची प्राथमिक फेरी ०१ आणि ०२ ऑक्टोबरला तर अंतिम फेरी शनिवार ७ ऑक्टोबरला
संपन्न होईल.

स्पर्धेचे प्रवेश अर्ज www.astitva.co.in या संकेतस्थळावरुन उपलब्ध आहेत अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २४
सप्टेंबर आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - रवी मिश्रा – ९८२१०४४८६२