बीडः पंचायत समितीच्या माजी सभापतीने केला गोळीबार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

बीड: पंचायत समितीचे माजी सभापती उमाकांत उर्फ काकासाहेब जोगदंड याने गोळीबार केल्याची घटना गुरुवारी (ता. 22) रात्री उशिरा चौसाळा (ता. जि. बीड) येथे घडली.

बीड: पंचायत समितीचे माजी सभापती उमाकांत उर्फ काकासाहेब जोगदंड याने गोळीबार केल्याची घटना गुरुवारी (ता. 22) रात्री उशिरा चौसाळा (ता. जि. बीड) येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काकासाहेब जोगदंड व शिवसेना कार्यकर्ते सयाजी शिंदे यांच्या राजकीय वाद आहे. जोगदंड व सयाजी यांचे बंधू प्रशांत शिंदे यांच्यात गुरुवारी दुपारी शाब्दिक वाद झाला. यानंतर रात्री जोगदंड हा आपल्या सहकाऱ्यांसह शिंदे यांच्या मुक्ताई नगर भागातील घरी गेले. तेथे पुन्हा वाद झाला. यावेळी जोगदंड याने आपल्याकडील पिस्तुल मधून शिंदे यांच्या दिशेने गोळी झाडली. शिंदे यांनी गोळी चुकवल्याने अनर्थ टळला. नेकनूर पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकाने पिस्तुल व गोळी ताब्यात घेतली.