बीड: चोरट्यांनी फोडली पोलिस ठाण्याजवळील सहा दुकाने

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

या घटनेमध्ये प्रवीण किराणा, बंकट स्वामी मेडिकल, हयात मेडीकल, रोटे ज्वेलर्स, नागरगोजे ज्वेलर्स या दुकानांचा समावेश आहे. यामध्ये चोरट्यांनी विशेषतः पैशाची गल्ले उचकले. प्रवीण किराणामधून चिल्लर, पैसे काही रोख  रक्कम, ३ किलो काजू व ३ किलो बदाम असा वीस ते पंचवीस हजारांचा डल्ला मारला.

नेकनूर (जि. बीड) : येथील पोलिस स्टेशनजवळील ६ दुकाने फोडल्याची घटना गुरुवारी (ता २४) रोजी पहाटे घडली.  

या घटनेमध्ये प्रवीण किराणा, बंकट स्वामी मेडिकल, हयात मेडीकल, रोटे ज्वेलर्स, नागरगोजे ज्वेलर्स या दुकानांचा समावेश आहे. यामध्ये चोरट्यांनी विशेषतः पैशाची गल्ले उचकले. प्रवीण किराणामधून चिल्लर, पैसे काही रोख  रक्कम, ३ किलो काजू व ३ किलो बदाम असा वीस ते पंचवीस हजारांचा डल्ला मारला. तर बंकट स्वामी मेडिकलच्या गल्ल्यातील पैसे व हयात मेडिकलमधील १० हजारांच्या जवळपास चिल्लर व काही रोख रक्कम पळवली. तर ज्वेलर्सचे दुकानातील कूलप तोडले पण चॅनेल गेटमुळे हि दुकाने वाचली.

या घटनेत चोरीची रक्कम कमी असली तरी पोलिस स्टेशन जवळील दुकाने फोडून पोलिसांबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.

Web Title: Beed news thief in beed