सापाने दंश केल्याने बालकाचा मृत्‍यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

स. जाहेद स. अलीम (वय 5) हा मुलगा घराबाहेर खेळण्यासाठी गेला असता त्‍याच्या पायाचा बोटाला रविवारी सकाळी अकराच्या दरम्‍यान सापाने चावा घेतला. मात्र पायाला काय चावले हे लक्षात न आल्याने बालकाचा मृत्‍यू झाला. रविवारचा दिवस असल्याने सरकारी व खासगी दवाखाने बंद होते

शिरडशहापूर, - शिरडशहापूर(ता.कळमनूरी) येथील एका पाच वर्षीय बालकाला खेळत असताना पायाच्या बोटाला सापाने दंश केल्यानंतर वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने त्‍याचा मृत्‍यू झाल्याची घटना रविवारी घडली.

या बाबत माहिती अशी की, शिरडशहापुर येथील दर्गा मोहल्‍ला भागातील स. जाहेद स. अलीम (वय 5) हा मुलगा घराबाहेर खेळण्यासाठी गेला असता त्‍याच्या पायाचा बोटाला रविवारी सकाळी अकराच्या दरम्‍यान सापाने चावा घेतला. मात्र पायाला काय चावले हे लक्षात न आल्याने बालकाचा मृत्‍यू झाला. रविवारचा दिवस असल्याने सरकारी व खासगी दवाखाने बंद होते.

नांदेड येथील रुग्णांलयात पोहचण्यासाठी दुपारचे तीन वाजले. तोपर्यत त्‍याचा मृत्‍यू झाला होता. रात्री उशिरा त्‍याच्यावर अंत्‍यसंस्‍कार करण्यात आले. दरम्यान येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्‍याचे उदघाटन करून येथे दोन वैद्यकीय अधिकाऱयांच्या जागा भरून कायमस्‍वरूपी निवासी वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य केंद्रास वाहन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी या दुदैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून केली जात आहे.