सामान्यांच्या जेवणात दिसू लागले वरण

file photo
file photo

तूरडाळ प्रथमच नीचांकीवर; उत्पादन वाढले

नांदेड: भरघोस उत्पादन, डाळीची केलेली आयात आणि कमी झालेल्या मागणीमुळे तूरडाळीच्या भावात विक्रमी घट झाली आहे. पाच वर्षांत प्रथमच तूरडाळीचे दर नीचांकीवर आले आहेत. २०१२ मध्ये डाळीचे भाव ७० ते ७५ प्रतिकिलो होती. यंदा त्याच डाळीचा दर ६५ ते ७० रुपये प्रतिकिलो आहे. सरकारकडे डाळीचा मोठा साठा असल्याने आगामी काळात दरवाढीची शक्‍यता कमीच आहे.

सर्वसामान्यांसह सर्वांच्याच ताटातील विशेष व आवश्‍यक पदार्थ म्हणून गणल्या जाणाऱ्या तूरडाळीचे भाव मागील दोन वर्षांपासून गगनाला भिडले आहेत. १७० ते २०० रुपये प्रतिकिलोपर्यंत मजल मारलेल्या तूरडाळीच्या भावाने जनसामान्यांचे आर्थिक बजेट बिघडले होते. नोव्हेंबरनंतर नोटाबंदीच्या फटक्‍यानंतर बाजारपेठेत आर्थिक उलाढाल कमी झाली. डाळीची मागणीही घटली. नोटाबंदीमुळे अनेक दालमिल संचालकांनीही गरज असेल तेवढीच तूर खरेदी करणे सुरू केले. त्यामुळे तुरीची आवक अधिक आणि मागणी कमी झाल्याने हमी भावापेक्षा तुरीची कमी दरात व्यापारी व दलाल खरेदी करीत होते.

दरम्यान, परदेशातून तूरडाळ मोठ्या प्रमाणात भारतात आली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तुरीची खरेदीवर अंकुश आणला. बाजार समितीत तुरीची आवक वाढली आणि खरेदीदार कमी झाल्याने ३२०० रुपये क्विंटलने तुरीची खरेदी होऊ लागली होती. तूर उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्यानंतर शासनाने ५२०० हमीभावाने तूरखरेदी करण्याची तंबी दिली. परिणामी, व्यापाऱ्यांनी तूरखरेदीच बंद केल्याने सरकारी साठ्यात वाढ झाली. त्यानंतरही भावात घसरण सुरूच होती. दरम्यान दर कमी झाल्याने आता सर्वसामान्य नागरिकांच्या जेवणात वरण दिसू लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com