उस्मानाबाद: पत्नीचा खून करुन पतीची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जुलै 2017

गौरगाव येथील बालाजी हरिभाऊ डोंगरे याला दारु व जुगाराचे व्यसन होते. त्यात बरबाद झाल्यावर पत्नीला मनीषा हिस माहेरहुन पैसे आण असा तगादा लावत. पैसे कमवण्यासाठी पत्नी शेतात मोलमजुरी करत असे.

उस्मानाबाद : जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथे पतीने पत्नीची हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 

गौरगाव येथील बालाजी हरिभाऊ डोंगरे याला दारु व जुगाराचे व्यसन होते. त्यात बरबाद झाल्यावर पत्नीला मनीषा हिस माहेरहुन पैसे आण असा तगादा लावत. पैसे कमवण्यासाठी पत्नी शेतात मोलमजुरी करत असे. पत्नीला कामावरून बोलावून घेऊन घरात गळा आवळून खून केला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी चादरीत शव गुंडाळून कपाटाखाली लपवून ठेवले. शाळा सुटल्यानंतर मुलाच्या लक्षात प्रकार आला.

दरम्यान घराशेजारील उसाच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन पतीने आत्महत्या केली आहे. शिराढोण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.