केडीएमटीच्या बसेस दुरुस्त करण्यास ठेकेदाराचा नकार

रविंद्र खरात
रविवार, 17 सप्टेंबर 2017

खर्च कमी करा -पी वेलरासु
दुरुस्तीचे काम ठेकेदाराने नकार दिल्याने नवीन गाड्या रस्त्यावर काढत उपन्न वाढवा आणि अधिक खर्चाला पालिका आयुक्त पी वेलरासु यांनी कात्री लावल्याने नवीन 40 मधील 35 आणि जुन्या 56 अश्या एकूण 81 बसेस ताप्यात आहेत. मात्र त्याही दुरुस्तीच्या कामाला केडीएमटीकडे बोटावर मोजणारे कर्मचारी वर्ग हातात असून यातील ही बसेस कधीही बंद पडण्याची भीती असल्याने केडीएमटी बंद होण्याच्या मार्गावर आहे.

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमाच्या नादुरुस्त बसेसची दुरुस्ती खासगी ठेकेदारमार्फत केली जात असून त्याचा ठेक्याची मुदत संपल्याने नव्याने दुरुस्तीचे काम संबधित ठेकेदाराने नकार दिल्याने नादुरुस्त बसेस संख्या वाढत असून दिवसेंदिवस केडीएमटीचे चाक गाळात अडकत असून प्रशासन अधिकारी वर्गाच्या उदासिनतामुळे उपक्रम बंद होतो की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.

कल्याण डोंबिवली महानगर पालिका परिवहन उपक्रमाच्या ताप्यात सध्या 218 बसेस आहेत. त्यातील 100 बसेसमधील 72 बसेस पूर्णपणे खराब असल्याने गणेशघाट डेपोमध्ये धूळ खात पडल्या आहेत. उर्वरित 28 बसेस प्रतिदिन रडतखडत रस्त्यावर धावत आहे, मात्र त्यातील अनेक बसेस पुन्हा पुन्हा दुरुस्तीसाठी डेपोमध्ये जातात. केडीएमटी प्रशासन नेहमी बोलत असते आमच्याकडे नवीन बसेस आहेत. मात्र 118 बसेस मधील 70 बसेस या दोन वर्षापूर्वी ताफ्यात आल्या असून त्यातील 42 बसेस मधील छोटे मोठे पार्ट नसल्याने बसेस धूळ खात पडल्या आहेत त्यातील 28 बसेस रस्त्यावर धावत आहेत.

काही महिन्यापूर्वी पुन्हा केडीएमटीच्या ताप्यात 40 बसेस नव्याने आल्या मात्र त्यातील 35 बसेस रस्त्यावर धावत असून 5 बसेस खराब झाल्या आहेत. म्हणजे केडीएमटीच्या एकूण 218 पैकी 81 बसेस रस्त्यावर धावत असल्याचे समोर येते मात्र त्यातील ही प्रतिदिन ब्रेक डाऊन झाल्याने डेपो मध्ये पाठविण्यात येतात. 

उपन्नवाढीसाठी मेहनत ...
बसेस दुरुस्तीचे काम ठेकेदाराने नकार दिल्याने सर्वानाच घाम फुटला आहे, बसेस वेळेवर बाहेर काढण्यासाठी केडीएमटी सभापती संजय पावशे सहित सर्व पक्षीय सदस्यांना गणेशघाट डेपो मध्ये पहाटे पहाटे हजेरी लावत 60 ते 80 बसेस बाहेर निघतात. मात्र त्यातील अनेक बसेस रस्त्यावर उभ्या कराव्या लागतात कारण काही न काही पार्ट खराब झालेला असतो.

खासगीकरणाचा सूर ..
उपन्न ही वाढत नाही, खर्च ही वाढत आहे, पालिकेची आर्थिक स्थिती सध्या नाजूक असल्याने केडीएमटीला अनुदान वेळेवर देणे शक्य नाही. यामुळे केडीएमटी खासगीकरण करा अश्या सूचना काही पालिका पदाधिकाऱ्यानी पालिका आयुक्त वेलरासु यांना दिल्या असून ते आता काय करतात याकडे लक्ष्य लागले आहे.

नियोजन शून्य
उपन्न वाढीचे मार्ग असलेल्या वाशी, पनवेल, बेलापूर, भिवंडी, रिंगरुट, लोढा आदी मार्गावर लक्ष्य देण्याऐवजी केडीएमटी प्रशासन भलत्याच मार्गावर बसेस सोडत असल्याने उपन्न ही घटत आहे.

खर्च कमी करा -पी वेलरासु
दुरुस्तीचे काम ठेकेदाराने नकार दिल्याने नवीन गाड्या रस्त्यावर काढत उपन्न वाढवा आणि अधिक खर्चाला पालिका आयुक्त पी वेलरासु यांनी कात्री लावल्याने नवीन 40 मधील 35 आणि जुन्या 56 अश्या एकूण 81 बसेस ताप्यात आहेत. मात्र त्याही दुरुस्तीच्या कामाला केडीएमटीकडे बोटावर मोजणारे कर्मचारी वर्ग हातात असून यातील ही बसेस कधीही बंद पडण्याची भीती असल्याने केडीएमटी बंद होण्याच्या मार्गावर आहे.

आयुक्तांच्या समोर ठेकेदार सोबत मीटिंग झाली मात्र त्याने काम करण्यास नकार दिला मात्र त्याने काम सोडलेले नाही तो हळूहळू 100 बसेस दुरुस्त करून देणार आहे. दुरुस्तीच्या कामाला खर्च वाढतोय आणि उपन्न कमी तर सध्या नवीन बसेस रस्त्यावर काढत उपन्न वाढीचे आदेश असल्याने त्याचे नियोजन सुरू असून केडीएमटी बंद होणार नाही आणि बसेस दुरुस्तीसाठी कर्मचारी कमी पडल्यास नवीन घेऊ अशी माहिती केडीएमटी महाव्यवस्थापक देविदास टेकाळे यांनी दिली.

ठेकेदारांची मुदत संपणार होती तर त्या अगोदर नियोजन करण्यास महाव्यवस्थापक देविदास टेकाळे अपयशी ठरले आहेत. पालिका आयुक्त आणि पालिका पदाधिकारी यांना चुकीची माहिती देतात, हातावर मोजणारे कर्मचारी बसेस दुरुस्त करत असून उपाययोजना केली नाही तर काही महिन्यात केडीएमटीला टाळे लावण्याची वेळ येईल याला जबाबदार केडीएमटी प्रशासन असल्याचा आरोप केडीएमटी परिवहन समिती सदस्य संतोष चव्हाण यांनी केला आहे.