बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरु; नागरिकांचे हाल

समीर सुर्वे
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

बेस्ट उपक्रम 70 वर्षांपुर्वी आजच्या दिवशी 
मुंबई महापालिकेत विलीन झाला होता. त्या निमीत्ताने मोठ्या धुमधडाक्यात बेस्ट दिन साजरा केला जातो. यंदा या बेस्ट दिनावर संपाचे सावट आहे.

मुंबई : बेस्टच्या 36 हजार कामगारांनी संप पुकारल्यामुळे आज (सोमवार) बस वाहतूक पुर्ण पणे ठप्प पडली. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

या संपावर तोडगा काढण्यासाठी दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि कामगार संघटनांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. संपामुळे बेस्टच्या तीन हजार पैकी एकही बस रस्त्यावर उतरलेली नाही. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी वाहानांचा वापर करावा लागत आहे. एसटीने मुंबईच्या आजूबाजूच्या परीसरातून 50 जादा बसेस सोडल्या आहेत.

बेस्ट उपक्रम 70 वर्षांपुर्वी आजच्या दिवशी 
मुंबई महापालिकेत विलीन झाला होता. त्या निमीत्ताने मोठ्या धुमधडाक्यात बेस्ट दिन साजरा केला जातो. यंदा या बेस्ट दिनावर संपाचे सावट आहे.