कल्याण डोंबिवली: जोरदार वाऱ्यासहित मुसळधार पाऊस

रविंद्र खरात 
शनिवार, 22 जुलै 2017

सलग आठ दिवस पावसाच्या हजेरीने शहरातील अनेक रस्त्यात खड्डे निर्माण झाले आहे ;दूसरी कड़े जोरदार वाऱ्यासहित पाऊस पड़त असल्याने झाड़े पडण्याच्या घटना वाढत आहेत

कल्याण - कल्याण डोंबिवली शहरी व ग्रामीण भागात जोरदार वाऱ्यासहित पावसाने हजेरी देत चांगलेच झोड़पून काढले आहे . जोरदार वाऱ्या मुळे झाड़े पडण्याच्या घटना वाढत असून मागील 24 तासात 5 झाड़े पडली असून त्यात सुदैवाने या घटनेतकोणतेही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही.

मागील दोन दिवसात कल्याण आणि डोंबिवली शहरी आणि ग्रामीण भागात जोरदार वाऱ्यासहित पाऊस सुरु आहे. मागील 24 तासात 85 मि मि पाऊस पडल्याची नोंद झाली असून 1जून 2017 पासून आज सकाळी सात वाजे पर्यंत एकूण 1784 मि मि पाऊस पडला आहे. सलग आठ दिवस पावसाच्या हजेरीने शहरातील अनेक रस्त्यात खड्डे निर्माण झाले आहे ;दूसरी कड़े जोरदार वाऱ्यासहित पाऊस पड़त असल्याने झाड़े पडण्याच्या घटना वाढत आहेत.

मागील 24 तासात कल्याण पश्चिम खड़कपाड़ा गांधारे रोड वरील आनंद नर्सरिंग होम जवळ झाड पडल्याच्या 5 घटना घडल्या आहेत. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाचे आपातकालीन पथक झाड़े बाजूला करण्याचे काम करत आहे.