अंबाबाईच्या घागरा-चोली रुपातील पुजेमुळे शिवसेनेचे आंदोलन

निवास चौगुले
रविवार, 11 जून 2017

शिवसेना व इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडत आंदोलन केले. या वेळी पूजा बांधणाऱ्या पूजकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

कोल्हापूर - साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणाऱ्या अंबाबाई मंदिरात नित्य पूजेनिमित्त अंबाबाईची घागरा-चोली रूपात पूजा बांधण्यात आली होती. या पूजेचा वाद आता आणखीन पेटला असून, समस्थ हिंदुत्त्ववादी संघटना आणि शिवसेनेने आज (रविवार) आंदोलन केले.

शिवसेना व इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडत आंदोलन केले. या वेळी पूजा बांधणाऱ्या पूजकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नगरसेवक अजित ठाणेकर आणि त्यांचे वडील वसंतराव ठाणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तसेच त्वरित कारवाई करण्याची मागणी देखील आंदोलकांनी केली.

या आंदोलनावरून तणाव निर्माण झाला होता. आंदोलनात शिवसेनेचे संजय पवार, दुर्गेश निग्रज, देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, वैशाली महाडिक आदी सदस्य सहभागी झाले होते. अंबाबाईची घागरा-चोली रुपात पूजा बांधण्यात आल्याने हा वाद निर्माण झाला आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा -
बीड: धानोराजवळ खासगी बसला अपघात; 12 ठार
गेवराई: बोअरवेलची गाडी पलटी होऊन दोन जण चिरडले

राजू शेट्टींवर सोडलेले सदाभाऊ अस्त्र मुख्यमंत्र्यांवर बुमरॅंग झाले !​
इंग्लंडच्या विजयाने बांगलादेश उपांत्य फेरीत; ऑस्ट्रेलियाचे पॅकअप​
आले ट्रम्प यांच्या मना...
शेतकरी आंदोलनाचं आक्रीत (आदिनाथ चव्हाण)​
यादव म्हणजेच मराठे? (सदानंद मोरे)​

#स्पर्धापरीक्षा - नोटाबंदी