मुख्यमंत्र्यांनी जगाचं ज्ञान, आत्मभान असणारा धैर्यवान मित्र गमावला

राजेंद्र सावंत
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

धडाडीचा, उमदा आणि अभ्यासू राजीव हा मैफीलप्रिय होता. प्रचंड वाचन असल्याने कोणत्याही विषयावर अभ्यासपुर्ण मत व्यक्त करताना तो सर्वांना हसवायचा देखील. इतरांना आनंद देणारा हा मित्र गमावला आहे.

पाथर्डी : कोणत्याही माणसाशी सहज मैत्री करणारा व जगाचं ज्ञान आणि आत्मभान असणारा धैर्यवान मित्र आम्ही गमावला आहे. राजीव विधानसभेत सत्ताधारी असताना अर्थसंकल्प व विकासाच्या विषयावर अभ्यासपूर्ण बोलायचा. मोनिका राजळेच्या पाठीमागे भक्कमपणे शक्ती उभा करणारा राजीव माझाही जिवलग होता असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कासार पिंपळगाव येथे झोपडीवर राजळे कुंटुबीयांचे सात्वन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, गिरीश महाजन सोमवारी रात्री आले होते. आप्पासाहेब राजळे, मोहिनी राजळे, मोनिका राजळे, राहुल राजळे, कृष्णा व कबीर यांचे सात्वन करीत आधाराचे दोन शब्द बोलून फडणवीस यांनी राजशे कुटुंबीयांचे दुःख सलके करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बोलताना फडणवीस म्हणाले, राजीव राजळे मी आम्ही सोबत विधानभेत काम केले.

धडाडीचा, उमदा आणि अभ्यासू राजीव हा मैफीलप्रिय होता. प्रचंड वाचन असल्याने कोणत्याही विषयावर अभ्यासपुर्ण मत व्यक्त करताना तो सर्वांना हसवायचा देखील. इतरांना आनंद देणारा हा मित्र गमावला आहे. मोनिका राजळे यांच्या पाठीमागे राजीवची शक्ती होती. कोणत्याही कार्यक्रमाचे योग्य नियोजन करण्यीच त्याची खासीयत होती. अर्थशास्त्राबद्दल राजळे यांना चांगल ज्ञान होतं. गरीबांचे प्रश्न शासनपातळीवर मांडुन त्य़ाची सोडवणुक करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची त्यांची वृत्ती मी जवळुन अभ्यासली होती.

राजळे गेल्याने माझा दिलदार मित्र गमावल्याची खंत आहे. परमेश्वर त्यांना चांगली जागा देईल असा मला विश्वास असल्याचे फडणवीस म्हणाले. यावेळी डॉ. भागवत कराड, राजीव राजळेंचे पाथर्डी, शवेगाव अहमदनगर येथील अनेक सहकारी उपसस्थीत होते. पोलिस प्रमुख डॉ. रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे, प्रांतअधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल, तहसीलदार नामदेव पाटील, पोलिसउपअधिक्षक अभिजीत शिवथरे, पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण  उपस्थित होते. दुपारी माजी महसुलमंत्री एकनाथ खडसे, जिल्हा पीरषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे व रात्री उशीरा माजीमंत्री राजेश टोपे यांनी राजळे कुंटुबाचे सात्वन केले.

Web Title: nagar news pathardi rajiv rajale cm devendra fadnavis