श्रीगोंद्यात भरदिवसा जैन मूर्तीची चोरी

संजय आ. काटे 
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

चोरीला गेलेल्या मूर्तीची किंमत नक्की कोणी सांगू शकले नाही कारण ती मूर्ती 250 वर्षांपूर्वीची आहे. दरम्यान श्रीगोंदा पोलीस घटनास्थळी काही वेळातच दाखल झाले. जवळील एका ठिकाणच्या सीसीटीव्हीत एक व्यक्ती साडेनऊच्या दरम्यान मंदिरात जाऊन लगेच काही मिनिटात बाहेर आल्याचे अस्पष्ट दिसत आहे.

श्रीगोंदा (जिल्हा नगर) : शहरातील मुख्य पेठेतील  जैन मंदिरातील चोवीस तीर्थंकर पार्श्वनाथ दिगंबर  भगवान महाराजांच्या २५० वर्षांपूर्वीची दोन किलो वजनाची पंचधातूची मूर्ती सकाळी चोरीला गेली.

तेथेच राहणारे डॉक्टर बडजाते सकाळची नेहमीप्रमाणे पूजा करून बाहेर आले. त्यांनतर त्यांच्या पत्नी 15 मिनिटात  देवाच्या दर्शनासाठी मंदिरात गेल्या त्यावेळी तेथे इतर संगमरवरी देवाच्या मूर्ती होत्या मात्र ही पंचधातूंची मूर्ती मात्र दिसली नाही. त्यांनतर मूर्तीची चोरी झाल्याचे लक्षात आले. 

चोरीला गेलेल्या मूर्तीची किंमत नक्की कोणी सांगू शकले नाही कारण ती मूर्ती 250 वर्षांपूर्वीची आहे. दरम्यान श्रीगोंदा पोलीस घटनास्थळी काही वेळातच दाखल झाले. जवळील एका ठिकाणच्या सीसीटीव्हीत एक व्यक्ती साडेनऊच्या दरम्यान मंदिरात जाऊन लगेच काही मिनिटात बाहेर आल्याचे अस्पष्ट दिसत आहे. त्याच्या हातात एक पिशवी असल्याने तोच चोर असू शकतो अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. शहरातील जैन बांधवांचे हे मंदिर श्रद्धास्थान आहे.