उदयनराजे सातारा पोलिस ठाण्यात झाले हजर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

सातारा : खंडणीच्या गुन्ह्यात खासदार छत्रपती उदयनराजे भोसले सातारा शहर पोलिस ठाण्यात हजर झाले. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी साताऱ्यात रोड शो केला होता. त्याची जोरदार चर्चा होती. 

त्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) खासदार उदयनराजे पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यांना वैद्यकीय तपासणीला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. कायदा हातात घेऊ नये संयम राखावा, असे आवाहन खासदार भोसले यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. दरम्यान, उदयनराजे यांना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी त्यांच्या समर्थनार्थ जमा होऊ लागली. 