कोयनेच्या पाणीसाठ्यात 0.50 टीएमसीने वाढ

सचिन शिंदे
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

कोयना धरणात आज ८३.८० टीएमसी पाणी साठा आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने काल दुपारी एकच्या सुमारास धरणाचे वक्र दरवाजे बंद केले. रविवारी दोन फुटाने दरवाजे उघडले होते. सोमवारी दुपारी एक फुटाने दरवाजे खाली घेण्यात आले होते. तर मंगळवारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस ओसरल्याने दरवाजे बंद करण्याचा निर्णय कोयना धरण व्यवस्थापनाने घेतला.

कऱ्हाड : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस ओसरला आहे. मात्र तरीही चोवीस तासात धरणात ०.५० टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली.

कोयना धरणात आज ८३.८० टीएमसी पाणी साठा आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने काल दुपारी एकच्या सुमारास धरणाचे वक्र दरवाजे बंद केले. रविवारी दोन फुटाने दरवाजे उघडले होते. सोमवारी दुपारी एक फुटाने दरवाजे खाली घेण्यात आले होते. तर मंगळवारी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस ओसरल्याने दरवाजे बंद करण्याचा निर्णय कोयना धरण व्यवस्थापनाने घेतला. पायथा वीजगृह अद्याप पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तो दोन हजार १६६ क्युसेक इतका आहे.

दोन दिवसात १.०६ टिएमसी पाणी कोयना नदीत सोडण्यात आले. चोवीस तासात कोयनानगरला २५ (३३००), नवजाला २३ (३६४४) व महाबळेश्र्वरला १८ (३११६) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणाची एकुण पाणीपातळी २१४५.०५ फुट झाली आहे. धरणात ८३.८० टीएमसी पाणी साठा झाला आहे.  कोयना जलाशयात १५ हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे.

Web Title: Satara news Koyna Dam water storage