कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती

सचिन शिंदे
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

चोवीस तासात ००.३८ टीएमसीने पाणी साठा वाढला. कालपर्यत पाणलोट पाऊस पडत आहे. त्यामुळे कमी प्रमणात धरणात पाण्याची आवक सुरूच आहे.

कऱ्हाड : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसात पावसाने पूर्ण विश्रांती दिली आहे.

चोवीस तासात ००.३८ टीएमसीने पाणी साठा वाढला. कालपर्यत पाणलोट पाऊस पडत आहे. त्यामुळे कमी प्रमाणात धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. धरणाच्या पाण्याची उंची ००.९३ फुटाने वाढली आहे. आज धरणाच्या पाण्याची उंची २१४८.०३ फुट आहे. धरणात चोवीस तासात ००.३८ टिएमसी पाण्याची आवक झाल्याने धरणात ८६.३४ टीएमसी पाणी साठा आहे. पाच दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला आहे.

काल कोयना भागात पावसाने पूर्ण उघडीप दिली. पायथा वीज गृहातुन सोडण्यात येणारे पाणीही बंद केले आहे. चोवीस तासात  कोयनानगरला ८ (३३८८), नवजाला ३५ (३७९४) व महाबळेश्र्वरला १६(३२३२) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना जलाशयात प्रतिसेकंद सात हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे.