कऱ्हाड: वीजेचा शॉक लागून शेतमजूराचा मृत्यू

सचिन शिंदे
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

वसंत डोंगळे यांच्या घरासमोर झाड आहे. त्यावरून ३३ के. व्ही. ची वीज वाहक तार गेली आहे. त्या झाडांच्या फांद्या वायरमनने तोडल्या नव्हत्या. त्या फाद्या झाडाला थटून स्पार्कींग होवून ठिणग्या पडत होत्या. यामुळे धोकादायक स्थिती निर्माण झाली होती. तारा केव्हा तुटून पडतील याचा नेम नव्हता.

कऱ्हाड : शेतमजूराचा झाडाच्या फांद्या तोडताना हाय होल्टेज वीजेचा शाॅक लागून जागीच मृत्यू झाला.

तालुक्यातील मांगवाडी - शिवाजीनगर येथे काल दुपारी घटना घडली. वसंत शिवाजी डोंगळे (वय ४०, रा. मांगवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेनंतर उंब्रज व मांगवाडी येथील संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याच्या पवित्रा घेतल्या. त्याचे गांभीर्य ओळखून वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून मृत व्यक्तीच्या कुटुंबाला चार लाखाची मदत जाहीर केली. त्यानंतर सायंकाळी मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाले.

वसंत डोंगळे यांच्या घरासमोर झाड आहे. त्यावरून ३३ के. व्ही. ची वीज वाहक तार गेली आहे. त्या झाडांच्या फांद्या वायरमनने तोडल्या नव्हत्या. त्या फाद्या झाडाला थटून स्पार्कींग होवून ठिणग्या पडत होत्या. यामुळे धोकादायक स्थिती निर्माण झाली होती. तारा केव्हा तुटून पडतील याचा नेम नव्हता. वीज मंडळ त्याकडे लक्ष देत नव्हते. त्यामुळे वसंत डोंगळे यांनी  त्यांच्या काल दुपारी त्या झाडावरील तारांच्या जवळील फांद्या तोडण्याचा प्रयत्न केला. ते फांद्यी तोडताना त्यातील एक फांदी तारेवर पडली. त्यामुळे वीज प्रवाह आला. त्याचा शाँक लागून व भाजून वसंत डोंगळे यांची जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर व उंब्रज ग्रामस्थांनी तातडीने डोंगळे यांच्या घराकडे धाव घेतली. वीज वितरणच्या गलथान कारभारामुळे हा प्रकार झाल्याचा आरोप करत त्यांनी  मृतदेहाला हात न लावण्याची भूमिका घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून उंब्रज वीज वितरणचे उप कार्यकारी अभियंता राजेंद्र वायदंडे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी  वायदंडे यांनी चार लाखाची मदत देण्याचे घोषित केले. तातडीची वीस हजाराची मदत दिली. त्यानंतर डोंगळे यांच्यावर रात्री उत्तरीय तपासणीनंतर अंत्यसंस्कार झाले.

टॅग्स