सोलापूर एसटी विभागातून पुणेसाठी जादा विशेष गाड्या

राजशेखर चौधरी
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

अक्कलकोट (सोलापूर) : येत्या १ नोव्हेंबरपासून १२५ दिवसांसाठी दररोज पावणे दोन तास रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी व शिर्डी-पंढरपूर-शिर्डी या दोन प्रवासी गाड्या संपूर्ण कालावधीसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. तर अन्य काही गाड्या ठराविक मार्गावर धावणार आहेत.

अक्कलकोट (सोलापूर) : येत्या १ नोव्हेंबरपासून १२५ दिवसांसाठी दररोज पावणे दोन तास रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी व शिर्डी-पंढरपूर-शिर्डी या दोन प्रवासी गाड्या संपूर्ण कालावधीसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. तर अन्य काही गाड्या ठराविक मार्गावर धावणार आहेत.

दररोज सोलापूर येथून इंद्रायणीला १५०० पर्यंत प्रवाशी ये-जा करतात. त्यामुळे येत्या १ नोव्हेंबर पासून १२५ दिवसासाठी दररोज १२ ते १ या वेळेत दर १२ मिनिटाला एक याप्रमाणे पाच विशेष गाड्या अक्कलकोट ते पुणे मार्गावर सोडण्यात येणार असल्याचे अक्कलकोट चे स्थानक प्रमुख संजय भोसले यांनी सांगितले. सोलापूर-दौंड रेल्वेमार्गावर वाशिंबे ते जेऊर दरम्यान रेल्वेमार्ग दुहेरीकरणाच्या कामासाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर-पुणे मार्गावर सोलापूर ते दौंडदरम्यान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे कामांतर्गत वाशिंबे ते जेऊर मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी या मार्गावर येत्या १ नोव्हेंबरपासून सुमारे तीन महिन्यांसाठी दररोज पावणे दोन तास रेल्वे वाहतूक थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी ही दैनिक गाडी व शिर्डी-पंढरपूर-शिर्डी ही साप्ताहिक (तीन दिवस) गाडी रद्द करण्यात आली आहे. याशिवाय पुणे-सोलापूर पॕसेंजर गाडी भिगवणपर्यंत धावणार आहे. तर सोलापूर-पुणे पॅसेंजर गाडीदेखील भिगवणपर्यंतच धावणार आहे.

हैद्राबाद-पुणे एक्स्प्रेस पुण्याला न जाता कुर्डूवाडीपर्यंत धावणार आहे. तर पुणे-हैद्राबाद एक्स्प्रेसही पुण्याहून न सुटता कुर्डूवाडीपासून सुटणार आहे. अमरावती-पुणे ही आठवड्यातून दोनवेळा धावणारी गाडी संपूर्ण १२५ दिवसांच्या कालावधीत एक तास उशिरा धावणार आहे.यामुळे सोलापूर विभागातील सोलापूर शहर,बार्शी,कुर्डुवाडी या आगारातून विशेष जादा गाड्या पुणेसाठी सोडल्या जाणार आहेत. जेणेकरून प्रवाश्याना कोणत्याही प्रकारच्या गैरसोयीला तोंड दयावे लागणार नाही

येत्या १ नोव्हेंबर पासून १२५ दिवसाच्या कालावधीसाठी रेल्वे सेवा बंद असलेल्या वेळेत सोलापूर,अक्कलकोट,कुर्डुवाडी व बार्शी आगारातून गरजेप्रमाणे जादा गाड्या पुण्यासाठी सोडले जाणार आहेत.तशी सूचना सर्व आगारांना देण्यात आली आहे.
- रमाकांत गायकवाड, विभागीय नियंत्रक, सोलापूर