आजही 'ती' पुन्हा बिघडली; मेढा आगाराचा भोंगळ कारभार

प्रमोद बोडके
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

यापुर्वी घडलेली घटना 
यापूर्वी 19 जूनला मेढा-सातारा-तुळजापूर बसची (एम एम 14 बीटी 3079) हेडलाइट बंद पडल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागला होता. आजही तसाच काहीसा अनुभव याच मार्गावरील बसने दिला आहे. मेढा आगारातील ढिसाळ नियोजनाचे दर्शन या निमित्ताने सातत्याने घडत आहे. 

सोलापूर : मेढा-सातारा-तुळजापूर बसचे आता रोज नविन किस्से समोर येउ लागलेत. 19 जूनला हेडलाइट बंद पडल्याने या मार्गावरील बसने प्रवाशांची चांगलीच सेवा केली होती. तशाच सेवेचा अनुभव आज मेढा-सातारा-तुळजापूर बसमधील प्रवाशांना आला. आजही ही बस पुन्हा पुन्हा बंद पडली. प्रवाशी दुसऱ्या बसने सोलापूरला आले. बस, वाहक आणि चालक मात्र पंढरपूरमध्येच राहिली. 

दररोज पावणे बाराच्या सुमारास मेढ्यातुन निघणारी ही बस कधी तरीच वेळेवर निघते. लांब पल्ल्याची ड्युटी करायची कोणी हा मेढा आगाराला न सुटणारा प्रश्न. कोणत्या तरी वाहक आणि चालकाला बळ बळ राजी करायच आणि बस पाठवायची हे ठरलेलेच. आजही तसच घडल. पावणे बाराला सुटणारी गाडी (एमएच 40 एन 9437) आज दिड वाजता मेढ्यातुन सुटली. लोकलला धावणारी गाडी लांब पल्ल्यासाठी आली. पाच वाजता गाडीने दहिवडी सोडली आणि टायर पंचर झाले. म्हसवडला जाणाऱ्या प्रवाशांची व्यवस्था कुर्ला-म्हसवड गाडीत करण्यात आली. पंढरपूरला जाणाऱ्या प्रवाशांची सोय मेंढा-बार्शी गाडीत करण्यात आली. सोलापूरला जाणाऱ्या प्रवाशांनी मात्र पंचर निघायची वाट बघितली. पंक्चर काढुन गाडी साडेपाचच्या सुमारास दहिवडी-गोंदवले परिसरातून निघाली. रिकामी झालेली गाडी म्हसवडला येइपर्यंत पुन्हा प्रवाशांनी भरली.

गाडी पंढरपूरला येताच बसमधील ग्रूप लाइट बंद पडली. गाडी सोलापूरला, तुळजापूरला जात नसल्याचे सांगताच साताऱ्यातून बसलेल्या प्रवाशांनी वाहकाचा आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा उध्दार करायला सुरुवात केली. प्रवाशांनाही उशीर झाला होता. पंढरपूर बसस्थानकात उभा असलेल्या कराड-सोलापूर बसमध्ये सोलापूरच्या प्रवाशांची रवानगी वाहकाने करुन दिली. तुळजापूरचे प्रवासी नसल्याने मेढा-सातारा-तुळजापूर बस पंढरपूर डेपोत दुरूस्तीला नेहण्यात आली. साडेसात वाजता दुरूस्तीला गेलेली बस साडेनऊला दुरूस्त झाली. प्रवाशांची रवानगी आगोदरच झाल्याने ही बस पंढरपूरमध्येच थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. 

यापुर्वी घडलेली घटना 
यापूर्वी 19 जूनला मेढा-सातारा-तुळजापूर बसची (एम एम 14 बीटी 3079) हेडलाइट बंद पडल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागला होता. आजही तसाच काहीसा अनुभव याच मार्गावरील बसने दिला आहे. मेढा आगारातील ढिसाळ नियोजनाचे दर्शन या निमित्ताने सातत्याने घडत आहे. 

महामंडळात असलेले ढिसाळ नियोजन, वर्षानवर्षे काम करुन देखील वाहक आणि चालकाला असलेला तुटपुंजा पगार यामुळे कर्मचाऱ्यांमध्येही मरगळ दिसत आहे. एसटीबद्दलची आत्मीयता दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.

Web Title: Solapur news ST bus problem