कोयना धरणाची पाणीपातळी झाली २१२५.१ फुट...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

चोवीस तासात कोयनानगरला ९६ (२६०१) मिलीमीटर, नवजाला ३८ (३००४)  पावसाची नोंद झाली. कोयना धरणाच्या पाणीपातळीत चार फुटाने वाढ झाली असुन एकुण पाणीपातळी २१२५.१ फुट आहे

कऱ्हाड - कोयना धरण परिसरात चोवीस तासात पावसाचा जोर ओसरला आहे. चोवीस तासात झालेल्या पावासाने कोयना धरणाच्या पाणी साठ्यात १.७७ टीएमसीने वाढ झाली.

पावसाचा जोर कमी झाला असला, तरी धरणाची पाणी पातळी पावणे दोन टीएमसीने पाणी साठ्यात वाढ झाली. कोयनेत ६७.४९ टीएमसी पाणी साठा होता. चोवीस तासात कोयनानगरला ९६ (२६०१) मिलीमीटर, नवजाला ३८ (३००४)  पावसाची नोंद झाली.

कोयना धरणाच्या पाणीपातळीत चार फुटाने वाढ झाली असुन एकुण पाणीपातळी २१२५.१ फुट आहे. दोन दिवसाच्या तुलनेत पावसाचा जोर कमी झाला तरी धरणात सध्या ६१ हजार क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे.