महापालिकेकडून आळंदीला दररोज २ लाख लिटर पाणी - महेश लांडगे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

पिंपरी -  पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र आळंदीला दररोज दोन लाख लिटर पाणीपुरवठा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून आळंदीकरांना दूषित पाणीपुरवठा केला जातो, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. मात्र, पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून आळंदीसाठी पिण्यासाठी पाणीपुरवठा करावा, यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा केला होता.

दरम्यान, या संदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि आमदार लांडगे यांची बैठकही झाली होती. 

पिंपरी- चिंचवडमधील औद्योगिक वसाहती आणि महापालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे इंद्रायणीच्या प्रदूषणात वाढ झाली. तेच पाणी पुढे आळंदीत बांधलेल्या बंधाऱ्यामध्ये जाते. या पाण्यावर प्रक्रिया करून नगर परिषद आळंदीकरांना पुरवठा करीत आहे. मात्र, पाणीप्रक्रिया प्रकल्प सदोष असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याबाबत पिंपरी- चिंचवड महापालिका प्रशासनाने तोडगा काढावा, अशी आग्रही मागणी आमदार लांडगे यांनी केली होती. त्याला महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पवना धरणातून पिंपरी- चिंचवडकरांसाठी पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी आवश्‍यक पाणीसाठ्याच्या शिल्लक कोट्यातून महापालिका आळंदीला पाणीपुरवठा करणार आहे.

आमदार लांडगे म्हणाले, ‘‘भामा आसखेड प्रकल्पातून पुणे महापालिका पाच एमएलडी पाणी देणार आहे. मात्र, आळंदीचा भविष्यातील विस्ताराचा विचार करून कुरळी येथील पंपिंग स्टेशनमधून काही एमएलडी पाणी आळंदी शहराला मिळावे, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यात येणार आहे. याबाबत लवकरच पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासोबत बैठक घेण्यात घेण्यात येणार आहे.’