अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी फरार

चिंतामणी क्षीरसागर
शुक्रवार, 30 जून 2017

बारामती तालुक्‍यातील सायंबाचीवाडी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्याचे समजल्याने आरोपी फरार झाला आहे.

बारामती (जि. पुणे) - बारामती तालुक्‍यातील सायंबाचीवाडी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्याचे समजल्याने आरोपी फरार झाला आहे.

सायंबाचीवाडी येथे पंधरा वर्षाच्या अल्पवयीन शालेय विद्यार्थीनीवर तिच्या घराशेजारी शेजारी राहणारा व्यक्ती अत्याचार करत होता. पीडित विद्यार्थीन शाळेच्या मधल्या सुटीत घरी जेवायला येते. त्यावेळी शेतीच्या कामानिमित्त तिचे बाहेर गेलेले असतात. ही वेळ साधून शेजारी राहणारे संभाजी कोलते तिच्यावर अत्याचार करत असत. जीवे मारण्याची धमकी दिल्याने गेल्या सहा महिन्यांपासून सुरु असलेल्या या प्रकाराबद्दल पीडित मुलीने याबाबत कोणालाही सांगितले नाही. या प्रकाराबाबत आईला संशय आल्याने आईने मुलीला विश्‍वासात घेऊन विचारणा केली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. याबाबत वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात आरोपी संभाजी कोलते यांच्याविरुद्ध धमकावणे व बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्याची माहिती मिळाल्याने आरोपी फरार आहे. याबाबत फौजदार अशीष जाधव पुढील तापस करत आहेत.