भंगार मालाच्या अनधिकृत दुकानांमुळे प्रदूषण

अनंत काकडे
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

चिखली - कुदळवाडी- मोशी रस्त्याच्या दोनही बाजूने मोठ्या प्रमाणात भंगार मालाची अनधिकृत दुकाने थाटण्यात आली आहेत. या दुकानांना वारंवार आगी लागतात. रसायनमिश्रित पिंप धुतले जातात, त्यामुळे हवा आणि पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. परंतु, या दुकानांवर कारवाईच होत नसल्याने या अनधिकृत दुकानांनी सर्व परिसर व्यापला आहे. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास भविष्यात नागरिकांना श्वास घेणेही मुश्‍कील होईल. 

चिखली - कुदळवाडी- मोशी रस्त्याच्या दोनही बाजूने मोठ्या प्रमाणात भंगार मालाची अनधिकृत दुकाने थाटण्यात आली आहेत. या दुकानांना वारंवार आगी लागतात. रसायनमिश्रित पिंप धुतले जातात, त्यामुळे हवा आणि पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. परंतु, या दुकानांवर कारवाईच होत नसल्याने या अनधिकृत दुकानांनी सर्व परिसर व्यापला आहे. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास भविष्यात नागरिकांना श्वास घेणेही मुश्‍कील होईल. 

कुदळवाडीचा मुख्य रस्ता, तसेच मोशी- चिखली रस्त्यावर मिळून कुदळवाडी परिसरात दीड हजाराच्या आसपास भंगार मालाची गोदामे आहेत. पिंपरी- चिंचवड तसेच चाकण परिसरातील उद्योग- व्यवसायातून त्यांना भंगार माल सहज उपलब्ध होतो. तसेच, अनेकजण चोरट्यामार्गानेही भंगार उपलब्ध करतात. त्याचबरोबर प्लॅस्टिक वस्तू सफाईचे व्यवसायही या परिसरात पाय रोवून आहेत. मात्र, हा व्यवसाय रसायनाशी संबंधित आहे. या भागातील भंगार गोदामाला वारंवार आगी लागतात, तर प्लॅस्टिक कचऱ्यामुळे हवा आणि पाण्याचे प्रदूषण होते. त्यामुळे हे व्यवसाय करताना त्यास महाराष्ट्र राज्य प्रदूषण महामंडळाची परवानगी आवश्‍यक आहे. तसेच, महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्‍यक असून, प्रदूषणाशी संबंधित व्यवसायांवर पालिकेच्या पर्यावरण विभागाचे नियंत्रण असते. मात्र, शॉपॲक्‍ट लायसेन्स सोडल्यास या व्यावसायिकांकडे प्रदूषण महामंडळ किंवा पालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र नाही. येथील उद्योग हे अनधिकृत आहेत. कुदळवाडीत भंगार व्यवसाय करणारे व्यावसायिक परप्रांतीय आहेत.

कचऱ्याच्या दरात भंगार घ्यायचे आणि त्याची साफसफाई करून ते चढ्या दराने विकले जाते. भरमसाट पैसा देणारा हा व्यवसाय असल्याने मोठ्या प्रमाणात परप्रांतीय हा व्यवसाय करतात. त्यामुळे या अनधिकृत व्यवसायाने कुदळवाडीचा संपूर्ण परिसर व्यापून गेला आहे. परंतु काही अपघात झाला किंवा भंगारमालाच्या गोदामांना आगी लागल्या की हे व्यावसायिक पसार होतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्याचबरोबर प्लॅस्टिक धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनामुळे प्रदूषण होते. परंतु असे असताना पालिकेने एकाही व्यावसायिकावर कारवाई केलेली नाही. तर, प्रदूषण महामंडळ नोटिसा बजावण्यापलीकडे काहीही करताना दिसत नाही. उलट एक दुसऱ्याकडे बोट दाखवत चालढकल मात्र करतात. याबाबत प्रदूषण नियंत्रण महामंडळाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असताना तो होऊ शकला नाही.

 

पुणे

नवी सांगवी : पिंपळे गुरव मध्ये गोळीबार झाल्याची खोटी अफवा पसरविणाऱ्यास सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. प्रसाद उर्फ लल्या...

11.18 AM

नवी सांगवी : "ऐन पावसाळ्यात पिंपळे गुरव परिसरातील कचरा कुंड्या ओसंडून वाहत असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण...

11.06 AM

पुणे -  ""सोपं असेल तर ते आयुष्य कसलं...? अडचणी, आव्हानं ही तर हवीतच ! गुळगुळीत रस्ते फार उपयोगाचे नाहीत. रस्त्यात...

05.03 AM