सांगवीत नागरीक कचराकुंड्याभोवतीच टाकतात कचरा

रमेश मोरे
मंगळवार, 29 मे 2018

जुनी सांगवी : जुनी सांगवीत रस्त्याकडेला ठेवण्यात आलेल्या कचराकुंड्यामधे नागरीक कचरा टाकण्याऐवेजी कचराकुंड्यांभोवती कचरा भिरकावुन टाकण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. दुचाकी,चारचाकी वहानांतुन कुंड्याचे दिशेने फेकलेला कचरा कुंड्यात न पडता कुंड्यांभोवती पडतो. हा कचरा भटकी जनावरे, कुत्री अस्तव्यस्त करून रस्त्यावर आणतात.

येथील वेताळ महाराज उद्यानाजवळील गणपती विसर्जन घाट, आनंदनगर मुळानदी किनारा रस्ता,  ममतानगर, दत्तमठ या रस्त्यावरील कुंड्याभोवती नागरीक कुंड्यांच्या आत कचरा टाकण्याऐवेजी कुंड्याभोवती कचरा भिरकवतात. तर शिवसृष्टी उद्यानाच्या सिमाभिंतीलगत येथील रहिवाशी उघड्यावर कचरा टाकतात सफाई कामगारांना रोज हा कचरा भरून  कुंड्यामधे टाकावा लागतो. येथील जयराज सोसायटी ममतानगर प्रियदर्शनी प्रमुख  रस्त्यावरील विद्युत रोहित्राच्या आजुबाजुला नागरीकांनी टाकलेला कच-याचा ढीग, मद्याच्या रिकाम्या बाटल्यांचा खच, घरातील टाकाऊ साहित्य या रोहित्राजवळ टाकण्यात आले होते.

रोहित्राला चारी बाजुंनी संरक्षक जाळी बसविण्यात आलेली आहे .मात्र काही महाभाग या विद्युत रोहित्राभोवती कचरा टाकत असल्याने येथे कच-याचा ढीग लागलेला सफाई कामगारांच्या निदर्शनास आला. आरोग्य अधिकारी उद्धव डवरी यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई कामगारांनी येथील दोन टेम्पो साचलेला कचरा काढुन उचलला. सार्वजनिक ठिकाणी बेफिकिरीने उघड्यावर टाकण्यात येणा-या कच-यामुळे परिसराला ओंगळपणा येत आहे.रस्त्यावर आलेल्या कच-यामुळे ईतरांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत  असल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत.

आरोग्य विभागाकडुन नियमित स्वच्छता केली जाते.मात्र ब-याचदा कचराकुंड्याभोवती नागरीकांनी टाकलेला कचरा आम्हाला उचलावा लागतो.
- उद्धव डवरी- आरोग्य अधिकारी प्रभाग क्रं ३२

Web Title: civilian throw garbage around the trash box in sangvi