पालिकेने पात्र लाभार्थ्यांच्या उशीरा आलेल्या जीएसटी पावत्या स्वीकारण्याची मागणी

The demand for acceptance of late GST receipts from eligible beneficiaries by the corporation
The demand for acceptance of late GST receipts from eligible beneficiaries by the corporation

जुनी सांगवी - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागाकडून सर्वसामान्यांसाठीच्या विविध योजना राबविण्यात येतात. सध्या नागरवस्ती विभागाकडून सायकल, शिलाई मशीन आदी योजनांसाठी पात्र लाभार्थी व कागदपत्रांच्या त्रुटीत अपात्र लाभार्थी यांची वस्तु खरेदीच्या जीएसटी पावत्या नागरवस्ती विभागाकडे जमा करण्यासाठी गर्दी आहे.

शिलाई मशीन खरेदीच्या जिएसटी पावत्या पहिल्या टप्प्यात जमा करण्यासाठी प्रशासनाकडून 31 जुलै पर्यंत जमा करण्याबाबतची माहिती लाभार्थ्यांना फोनवर मॅसेजद्वारे कळविण्यात आली होती. त्यानंतर यासाठी 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तर दुसऱ्या टप्प्यात 31 ऑगस्ट पर्यंत पावत्या सादर करण्याची मुदत होती. मात्र पहिल्या टप्प्यातील अनेकजणांना हा मॅसेज उशीरा प्राप्त झाला. काहींनी हा मॅसेज पाहिला नाही. तर काहींनी चुकीचा फोन क्र. अर्जात नमुद केल्याने अनेक शिलाई मशीन लाभार्थी पात्र असुनही उशीरा जीएसटीच्या पावत्या सादर करण्यासाठी पालिकेकडे खेटे घालत आहे. अनेकांना पावत्या जमा करण्याची मुदत संपल्याने पालिका प्रशासनाकडून उभारण्यात आलेल्या माहिती कक्षाकडून परत पाठवण्यात आले.

बऱ्याच लाभार्थ्यांना मॅसेज उशिरा मिळाला किंवा कुणी पाहिला नाही फोनमधुन नजरचुकीने डिलिट झाल्यामुळे केवळ प्रशासनाकडून दिलेल्या तारखेत जीएसटी पावती सादर करू न शकल्याने लाभार्थी नागरीक वंचित राहु शकतात. असे होवु नये यासाठी उशीरा आलेल्या शिलाई मशीन व इतर पावत्या प्रशासनाकडून सरसकट जमा करून घ्याव्यात व छाननी नंतर पात्र लाभार्थ्यांना अनुदान मिळावे, याची प्रशासनाने काळजी घ्यावी. याबाबत नागरवस्ती विभागाकडे नगरसेवक संतोष कांबळे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

नागरवस्ती विभागाने उशीरा आलेल्या पावत्या जमा करून घ्याव्यात. यामुळे पात्र लाभार्थी लाभापासुन वंचित राहणार नाही. - संतोष कांबळे, नगरसेवक प्रभाग क्र. 32

पहिल्या टप्प्यातील पात्र लाभार्थींना जुलै संपुर्ण महिना व त्यानंतर पंधरा दिवसाची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे मुदतीनंतरही उशीरा येणाऱ्या पावत्या स्विकारण्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून पुढील आठवडाभरात निर्णय घेण्यात येईल. याचबरोबर नागरीकांनी दुकानदारांकडून जिएसटीच्या खऱ्या पावत्या खात्री करूनच जमा कराव्यात. - स्मिता झगडे, सहाय्यकआयुक्त नागरवस्ती विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com