खंडित वीजपुरवठ्यामुळे उद्योजक हैराण

vij.jpg
vij.jpg

रावेत. ता. २८  : रूपीनगर,जोतिबानगर, तळवडे परिसरांतील वीजपुरवठा अचानक खंडित होत असल्याने नागरिकांसह लघुउद्योजक हैराण झाले आहेत. ही समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी होत आहे.

जोतिबानगर भागात मोठ्या प्रमाणात लघुउद्योजक आहेत. त्यांना मोठ-मोठ्या कंपन्याच्या ऑर्डर वेळेत पूर्ण कराव्या लागतात. पण, वीज गायब झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. स्वयंचलित यंत्राचे तापमान गाठण्यासाठी वीज आल्यानंतरही दोन-तीन तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे छोट्या उद्योगांचे आर्थिक नुकसान होत आहे. रूपीनगरमध्ये रात्री वीजपुरवठा झाला नसल्याने उकाड्याचा त्रास अनेकांना सहन करावा लागतो. 

औद्योगिक व घरगुती वापरासाठी अशी विभागणी करून वीजपुरवठा केला जावा. या ठिकाणी सबस्टेशन सुरू करून नागरिकांची समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी नागरिकांची मागणी आहे. जोतिबानगर आंत्रप्रिनर्स असोसिएशनचे सचिव कीर्ती शहा म्हणाले, वीज अचानक गायब होत असल्याने लघुउद्योकांना ऑर्डरी वेळेत पूर्ण करता येत नाहीत. ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. कामाचे वेळापत्रक कोलमडले आहे. तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. कामगारांचा पगार, मोठी यंत्रणा ठप्प पडल्याने उद्योगांचे गणितच बिघडत चालले आहे. 

नगरसेवक प्रवीण भालेकर म्हणाले, वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक व लघुउद्योजक हैराण आहेत. तक्रार करण्यासाठी कित्येक वेळेला फोन लागत नाही. तक्रारीची दखल घेऊन वीजपुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी यंत्रणा उशिरा कामाला लागते. महावितरणकडे नादुरूस्त भूमिगत केबलचा शोध घेण्यासाठी यंत्रणा व वाहने कमी आहेत. पुरेसे कर्मचारी नाहीत, त्याचा फटका सामन्यांसह उद्योगांना बसत आहे.

केबल तुटणे, कंडक्‍टर खराब होणे यांसारख्या तांत्रिक अडचणीमुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. पण, दुरुस्ती करून आता वीजपुरवठा नियमित करण्यात आला आहे. भविष्यातही तो सुरळीत सुरू राहील, याची काळजी घेण्यात येईल.
- अनिल उलसुरकर, उपअभियंता, महावितरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com