वल्लभनगर आगारातून पाच शहरांसाठी जादा बस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

निगडी - एसटीच्या वल्लभनगर आगारातून सुट्यांच्या पार्श्‍वभूमीवर
पाच शहरांसाठी आठ जादा गाड्या पंधरा जूनपर्यंत सुरू करण्यात आल्या आहेत. वल्लभनगर आगार व्यवस्थापक अनिल भिसे यांनी याबाबत माहिती दिली. 

सुट्यांच्या पार्श्‍वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या जादा एसटी बस कोल्हापूर, लातूर, चिपळूण, गोंदवले आणि नाशिक या मार्गांवर धावत आहेत. या जादा गाड्यांचे ऑनलाइन बुकिंग उपलब्ध आहे. तसेच अधिकृत एजंट आणि गाडी सुटण्याच्या आधी अर्ध्या तासापर्यंत हे आगाऊ आरक्षण बुकिंग करता येणार आहे. 

कोल्हापूरकडे जाणाऱ्या फेऱ्या या शहराच्या बाहेरून म्हणजेच डांगे चौक, चांदणी चौकमार्गे देहूरोड कात्रज बायपास रस्त्याने असल्याने वाहतूक कोंडी आणि एकूणच शहरातून जाण्यासाठी लागणारा वेळ वाचून प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. कोल्हापूरसाठी सकाळी साडेसहा, साडेसात, सायंकाळी पावणेचार, पावणेपाच वाजता बस उपलब्ध असणार आहे. लातूरसाठी रात्री साडेआठ, गोंदवलेसाठी सायंकाळी साडेसात, चिपळूणसाठी रात्री साडेनऊ आणि 
नाशिकसाठी सायंकाळी साडेसात वाजता एसटी बस वल्लभनगर आगारातून सुटणार आहेत.

उन्हाळ्याच्या सुट्या आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता वल्लभनगर आगारातून आठ जादा बसची व्यवस्था केली आहे. १५ जूनपर्यंत या फेऱ्या सुरू असणार आहेत. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद या फेऱ्यांसाठी मिळत आहे.
- अनिल भिसे, आगार व्यवस्थापक, वल्लभनगर

Web Title: extra bus for five city in vallabhnagar depo