आणखी 864 जणांचे स्वप्न साकारणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 एप्रिल 2018

पिंपरी - आर्थिक दुर्बल घटकांसाठी महापालिकेतर्फे चिखली येथे घरकुल योजना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत २०११ मध्ये काढलेल्या सोडतीमधील ८६४ जण प्रतीक्षा यादीत होते. त्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी ५० हजार रुपये स्वहिस्सा भरण्यास आयुक्तांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील नागरिकांचे घराचे स्वप्न आता साकार होणार आहे. 

केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत (जेएनएनयुआर) महापालिकेने आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना हाती घेतली आहे. त्यासाठी नवनगर विकास प्राधिकरणाच्या चिखली येथील स्टेक्‍टर १७ व १९ मध्ये इमारती उभारल्या आहेत. अनेक जणांना सदनिकांचा ताबा मिळालेला आहे. मात्र, पात्र लाभार्थींची संगणकीय सोडत २३ ऑगस्ट २०११ रोजी काढण्यात आली होती. तब्बल साडेसात वर्षांनंतर त्यांची प्रतीक्षा संपत आली आहे, कारण त्यांना स्वहिस्सा भरण्यास आयुक्त हर्डीकर यांनी मान्यता दिलेली आहे. या लाभार्थींची यादी झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाच्या चिंचवड येथील कार्यालयात प्रसिद्ध केली आहे.

हरकती नोंदवा
घरकुल योजनेच्या प्रतीक्षा यादीतील लाभार्थींना सोमवारपासून (ता. ९) पत्र वाटप केले जाणार आहेत. नऊ जूनपर्यंत पत्रांचे वाटप केले जाणार आहे. पत्र घेऊन त्यांनी सदनिकांबाबतची पुढील कार्यवाही करायची आहे. तसेच, प्रतीक्षा यादीबाबत १५ दिवसांत हरकती व आक्षेप नोंदवायचे आहेत, असे आवाहन झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाने केले आहे. 

Web Title: Housing Scheme at Chikhli