नाशिक महामार्गावर अनधिकृत ‘मंडई’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

पिंपरी - भोसरीमध्ये पुणे- नाशिक मार्गावर फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. त्यावर कारवाई न करता महापालिकेने त्यांच्यासाठी ‘लक्ष्मणरेषा’ आखली असून, त्याचे पालन करण्याचे फर्मानही सोडले आहे. यामुळे महामार्गाची मंडई झाली आहे.

भोसरीतील वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून उड्डाण पूल बांधला. मात्र त्यानंतरही भोसरीतील वाहतूक कोंडी कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याला कारण म्हणजे उड्डाण पुलाखाली तसेच रस्त्यावर जवळपास पाचशे फेरीवाल्यांनी बस्तान बसविले आहे.

रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या या अतिक्रमणामुळे महामार्गाला एखाद्या मंडईचे स्वरूप आले आहे. भोसरी पुलाखाली खाद्यपदार्थांच्या गाड्या लागतात. यापैकी चायनीज आणि अंडाभुर्जीच्या गाड्यांवर येणारे ग्राहक खुलेआम दारू पीत बसतात. सायंकाळनंतर येथील अतिक्रमणांवर कारवाई करण्यास महापालिकेकडे पथक नसल्याने त्यांचा हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या फेरीवाल्यांवर वाहतूक पोलिसांनी खटले दाखल केले आहेत. मात्र फेरीवाल्यांनी खोटी नावे सांगितल्याने खटला न्यायालयात गेल्यावर कोणीच त्यासाठी उपस्थित राहात नाही. यामुळे हे खटले प्रलंबितच राहात आहेत.