जॉगींग ट्रॅकचे काम प्रगतीपथावर 

रमेश मोरे
शनिवार, 26 मे 2018

येथे फायकस, चाफा, नांद्रुक, साग आदी प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. पन्नासच्यावर पुनररोपण केलेली जवळपास सर्व झाडे जगली आहेत. यामुळे जॉगींग ट्रॅक व पी.डब्ल्यु.डी.मैदानाचा ओसाडपणा जावुन किनारा हिरवागार होणार आहे. 

सांगवी :  सांगवी येथील साईचौक, इंद्रप्रस्थ, महाराणा प्रताप चौक इथपर्यंत करण्यात येणाऱ्या जॉगींग ट्रॅकचे काम प्रगतीपथावर आहे. पी.डब्ल्यु.डी. मैदानाच्या किनाऱ्यालगत सुरू असलेल्या या जागेत महापालिकेकडुन जॉगींग ट्रॅक बनविण्यात येत आहे. पावसाळ्यात मैदानावरील माती ट्रॅकवर येवु नये यासाठी ठिकठिकाणी चौकोणी आकाराच्या भिंती बांधण्यात येत आहेत. उद्यान विभागाकडून पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानाच्या कामादरम्यान काढण्यात आलेल्या झाडांचे या जॉगींग ट्रॅकच्या कडेने पुनररोपण करण्यात आलेले आहे. येथे फायकस, चाफा, नांद्रुक, साग आदी प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. पन्नासच्यावर पुनररोपण केलेली जवळपास सर्व झाडे जगली आहेत. यामुळे जॉगींग ट्रॅक व पी.डब्ल्यु.डी.मैदानाचा ओसाडपणा जावुन किनारा हिरवागार होणार आहे. 
ट्रॅकवर रंगीत गट्टु फऱ्शी बसविण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. जागोजागी चौकोणी आकाराच्या बांधलेल्या भिंतींना रंगरंगोटी करून त्यावर रंगाने सप्तरंगी इंद्रधनुष्य रेखाटण्यात येणार आहे. याचबरोबर या भिंतींवर वेली सोडण्यात येणार आहेत.

पावसाळ्यापुर्वी जॉगींग ट्रॅकचे काम पुर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे परिसराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे. 
शिरिष पोरेडी अभियंता ह प्रभाग

या परिसरात पुर्वी कचरा पडलेला असायचा पण या जॉगींग ट्रॅकमुळे परिसर स्वच्छतेबरोबरच फिरायला येणाऱ्यांसाठी वातावरण आल्हाददायक ठरेल
 माई ढोरे, नगरसेविका

Web Title: jogging trunk work in progress