पिंपरीमध्ये मुळा नदीत दोन मुले बुडाली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

पिंपरी : जगताप डेअरी कस्पटेवस्ती येथे मुळा नदीत गणेश विसर्जन करताना दोन मुले बुडाल्याची घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. 

पिंपरी आणि पुणे अग्निशमन पथकाकडून मुलांचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक अग्निशामक अधिकारी उदय वानखडे यांनी दिली.

सोनाजी शेळके (वय 15) आणि पवन वरखड (वय 17) अशी या दोन मुलांची नावे असल्याचे समजले आहे.